मनोरा
बॅडमिंटन स्पर्धेत विहा, अद्विक, केशवी, सयुज्व, सहाना, आयांश, सहज विजेते!
सहाना
प्रभुगावकरचा दुहेरी मुकुट
मनोरा
अकादमीची १२० वी स्पर्धा उत्साहात, १५० हून
अधिक खेळाडूंचा सहभाग
मुंबई
: बॅडमिंटन कोर्टवरील चुरशीच्या लढती,
नवोदित खेळाडूंचा उत्साह आणि विजेतेपदासाठीची रंगतदार चढाओढ अशा
वातावरणात मनोरा बॅडमिंटन अकादमीची १२० वी स्पर्धा किंग सर्कल येथील नॉर्थ इंडियन
असोसिएशनच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडली. या स्पर्धेत विहा झालबा,
अद्विक तिवारी, केशवी महेश्वरी, सयुज्व रजपूत, सहाना प्रभुगावकर, आयांश जैन आणि सहज कदम यांनी आपापल्या वयोगटांत
विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, सहाना प्रभुगावकरने १३
आणि १५ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुटाचा मान
पटकावला.
मुंबईसह
विविध शहरांतील खेळाडूंचा सहभाग
मनोरा
बॅडमिंटन अकादमीच्या या स्पर्धेत मुंबई, नवी
मुंबई, नाशिक, पालघर, कुडाळ, वसई आणि विरार येथील १५० हून अधिक
खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विविध वयोगटांतील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे
प्रदर्शन करत स्पर्धेत रंगत आणली. अकादमीची ही १२० वी स्पर्धा असल्याने या
आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
मान्यवरांच्या
हस्ते पारितोषिक वितरण
स्पर्धेचा
पारितोषिक वितरण समारंभ नॉर्थ इंडियन असोसिएशनचे राजन शहा,
केतन पंड्या आणि मनोहर गोडसे
यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नॉर्थ इंडियन असोसिएशनचे हिरेन छेडा यांनीही
स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
मुलींच्या
गटातील अंतिम निकाल
- ९ वर्षांखालील : विहा झालबा विजेती; उपविजेती यांती गावडे.
- ११ वर्षांखालील : केशवी महेश्वरी विजेती;
उपविजेती सुमेधा मोरे.
- १३ वर्षांखालील : सहाना प्रभुगावकर विजेती;
उपविजेती केशवी महेश्वरी.
- १५ वर्षांखालील : सहाना प्रभुगावकर विजेती;
उपविजेती केश्वी उचील.
मुलांच्या
गटातील अंतिम निकाल
- ९ वर्षांखालील : अद्विक तिवारी विजेता;
उपविजेता कबीर पारेख.
- ११ वर्षांखालील : सयुज्व रजपूत विजेता;
उपविजेता अद्विक तिवारी.
- १३ वर्षांखालील : आयांश जैन विजेता; उपविजेता अधरीत सिंग.
- १५ वर्षांखालील : सहज कदम विजेता; उपविजेता रायन शहा.

Post a Comment
0 Comments