मैदानातील
दिग्गजांना विचारे प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा!
उदय
देशपांडे, संदीप चव्हाण यांना
जीवनगौरव
रौप्यमहोत्सवी
मराठी गौरव पुरस्कार सोहळ्यात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
२५
व्या रौप्यमहोत्सवी मराठी गौरव पुरस्कार सोहळ्यात क्रीडा आणि क्रीडा पत्रकारितेतील
दिग्गजांचा सन्मान
२१
नोव्हेंबरला मुंबई मराठी पत्रकार संघात रंगणार गौरव सोहळा
मुंबई
: क्रीडा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा
उमटविणारे आणि क्रीडा पत्रकारितेतून मैदानावरील इतिहास शब्दबद्ध करणारे दोन दिग्गज
एकाच व्यासपीठावर सन्मानित होणार आहेत! पद्मश्री मल्लखांब प्रशिक्षक उदय
देशपांडे आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांना
कै. मनोहर विचारे प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात
येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील तपस्वी योगदान आणि पत्रकारितेतील प्रदीर्घ,
समर्पित कारकीर्द यांचा सन्मान करणारा हा सोहळा प्रतिष्ठानच्या २९
व्या वर्धापन दिनानिमित्त आणि २५ व्या रौप्यमहोत्सवी मराठी गौरव पुरस्कार वर्षाचे
औचित्य साधून शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात रंगणार आहे.
मल्लखांबाच्या
जागतिक प्रसारासाठी देशपांडे यांचे आयुष्य समर्पित!
भारतीय
पारंपरिक खेळ मल्लखांबाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्य
वेचणारे पद्मश्री उदय देशपांडे यांच्या कार्याचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव
करण्यात येणार आहे. मल्लखांब प्रशिक्षण, खेळाचा
प्रचार-प्रसार, नव्या पिढीला घडविणे आणि भारतीय क्रीडा
संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या
प्रदीर्घ कार्याची दखल घेत प्रतिष्ठानने त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला
आहे.
सहा
ऑलिम्पिकचे साक्षीदार; संदीप
चव्हाण यांच्या लेखणीचा गौरव!
क्रीडा
पत्रकारितेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेणाऱ्या संदीप चव्हाण यांचाही
जीवनगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. सहा ऑलिम्पिक स्पर्धांसह अनेक
महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन करणाऱ्या चव्हाण यांनी
आपल्या लेखणीने क्रीडा विश्वातील अनेक ऐतिहासिक क्षण वाचकांपर्यंत पोहोचविले.
मैदानावरील संघर्ष, खेळाडूंचे यश, पराभवामागील कहाणी आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींना पत्रकारितेच्या
माध्यमातून व्यापक दृष्टिकोन देणाऱ्या त्यांच्या कारकिर्दीचा हा गौरव आहे. मुंबई
मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही ते पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण
भूमिका बजावत आहेत.
क्रीडा
क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी!
या
पुरस्कार सोहळ्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे,
अर्जुन पुरस्कार विजेते ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक प्रवीण ठिपसे
आणि महाराष्ट्राचे पहिले भारतश्री व राष्ट्रीय कबड्डीपटू विजू पेणकर प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. क्रीडा क्षेत्रातील विविध पिढ्यांचे
प्रतिनिधित्व करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे पुरस्कार सोहळ्याला विशेष
प्रतिष्ठा लाभणार आहे.
रौप्यमहोत्सवी
वर्षात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा विशेष गौरव!
प्रतिष्ठानच्या
२५ व्या रौप्यमहोत्सवी पुरस्कार वर्षाचे औचित्य साधून विविध खेळांमधील प्रशिक्षक,
खेळाडू, संघटक आणि पत्रकारांचा विशेष सन्मान
करण्यात येणार आहे. यामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक
दिनेश लाड, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन
गोखले, पद्मश्री अनुपमा गोखले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कॅरम संघटक अरुण केदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कॅरमपटू अनुपमा केदार, अर्जुन पुरस्कार विजेत्या जलतरणपटू आरती प्रधान यांचा
समावेश आहे.
पत्रकारिता,
छायाचित्रण आणि क्रीडा संघटन क्षेत्रालाही सलाम!
क्रीडा
पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी,
प्रल्हाद नाखवा, अशोक बोबाटे आणि अश्विन बापट
यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मिड-डेचे छायाचित्रकार अतुल कांबळे,
क्रिकेट संघटक जयेश कुलकर्णी आणि क्रिकेट गुणलेखक दीपक
जोशी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.
मैदानावरील कामगिरीइतकेच पडद्यामागे खेळासाठी झटणाऱ्या व्यक्तींचे योगदान
महत्त्वाचे असते, याची जाणीव करून देणारा हा सन्मान सोहळा
ठरणार आहे.
मधुकर
धीरत यांचा विशेष सत्कार!
शिवछत्रपती
पुरस्कार विजेते शरीरसौष्ठव प्रशिक्षक मधुकर धीरत यांचाही यावेळी विशेष
सत्कार करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांची प्रदीर्घ साधना,
प्रशिक्षणातील योगदान आणि शरीरसौष्ठव खेळासाठी केलेले कार्य यांचा
गौरव या निमित्ताने केला जाणार आहे. याशिवाय क्रीडा, शिक्षण,
सामाजिक कार्य आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या
गुणवंतांना मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
गुणवंतांच्या
कार्याचा गौरव हीच प्रतिष्ठानची परंपरा!
कै.
मनोहर विचारे प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष अजय मनोहर विचारे यांच्या
पुढाकाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजासाठी निःस्वार्थ
योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे,
नव्या पिढीसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवणे आणि विविध
क्षेत्रांतील गुणवंतांना प्रतिष्ठेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा प्रतिष्ठानच्या पुरस्कार उपक्रमामागील उद्देश आहे. २५ वर्षांच्या
पुरस्कार परंपरेचा रौप्यमहोत्सवी टप्पा गाठताना हा गौरव सोहळा केवळ पुरस्कार
वितरणापुरता मर्यादित न राहता कर्तृत्व, समर्पण आणि
प्रेरणेचा उत्सव ठरणार आहे.
क्रीडा
क्षेत्रातील दोन दिग्गजांच्या जीवनगौरवाने आणि विविध क्षेत्रांतील गुणवंतांच्या
सन्मानाने २१ नोव्हेंबरची मुंबईची संध्याकाळ कर्तृत्वाच्या गौरवाने उजळणार आहे.

Post a Comment
0 Comments