मुंबई
उपनगर कबड्डी असोसिएशन व सुधीर मोरे मित्र मंडळ आयोजित
४४
वी मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
स्वराज्य
स्पोर्ट्सची आगेकूच!
महिलांत
४०-७ असा धडाकेबाज विजय
स्वस्तिक,
संघर्ष, यंग स्टार आणि जय लहुजी प्रथम श्रेणी
पुरुषांत दुसऱ्या फेरीत
मुंबई
: मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या ४४व्या
जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्सने
प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम श्रेणी पुरुष
गटात स्वस्तिक मंडळ, संघर्ष मंडळ, यंग स्टार स्पोर्ट्स आणि जय लहुजी यांनी दमदार विजय नोंदवत दुसऱ्या फेरीत
धडक दिली. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त
विद्यमाने महापालिका मैदान, कैलास कॉम्प्लेक्स रोड, पार्कसाइट, विक्रोळी (प.) येथे ही स्पर्धा सुरू आहे.
स्वराज्यचा
४०-७ असा एकतर्फी विजय!
महिला
गटात स्वराज्य स्पोर्ट्सने माऊली प्रतिष्ठानचा ४०-७ असा अक्षरशः धुव्वा उडविला.
मध्यंतराला २६-३ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या स्वराज्यने उत्तरार्धात खेळाचा वेग
काहीसा कमी केला, तरी प्रतिस्पर्ध्याला डोके
वर काढण्याची संधी न देता मोठा विजय साकारला. याशिका पुजारी आणि तन्वी पवार
यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. माऊली प्रतिष्ठानच्या कंचना कुमारीला मात्र या
सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नाही.
स्वस्तिकची
पिछाडीवरून विजयी मुसंडी!
प्रथम
श्रेणी पुरुषांच्या पहिल्या फेरीत स्वस्तिक मंडळाने नव महाराष्ट्रचे आव्हान २७-२१
असे परतवून लावले. मध्यंतराला ७-१४ अशा सात गुणांच्या पिछाडीवर असलेल्या
स्वस्तिकने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अनुराग
पाटील आणि प्रजोत कदम यांच्या आक्रमक व जोशपूर्ण खेळाने स्वस्तिकच्या विजयाचा
मार्ग सुकर केला. नव महाराष्ट्रकडून अजिक्य देवकर आणि सनी यादव यांनी पूर्वार्धात
संघाला आघाडी मिळवून दिली; मात्र
उत्तरार्धात त्यांची चमक फिकी पडली.
संघर्ष
मंडळाची यजमान गुरुकृपावर मात!
संघर्ष
मंडळाने यजमान गुरुकृपा संघाचा २९-१५ असा पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. केतन
मुरकर आणि धीरज जाधव यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर संघर्षने सामन्यावर
वर्चस्व राखले. गुरुकृपाकडून कार्तिक कृपानीने चांगली झुंज दिली.
यंग
स्टारची पंचवटीवर मात!
यंग
स्टार स्पोर्ट्सने पंचवटी मंडळावर २६-१० असा सहज विजय मिळविला. विवेक चाळके आणि
रोहित विश्वकर्मा यांनी चढाई व पकडीमध्ये प्रभावी खेळ करीत यंग स्टारच्या
विजयात मोलाचे योगदान दिले. पंचवटीकडून महेश वायकरने चांगला खेळ केला.
जय
लहुजीचा श्रीसाईवर दणदणीत विजय!
जय
लहुजीने श्रीसाई स्पोर्ट्सचा ३७-१० असा धुव्वा उडवत स्पर्धेत आगेकूच केली. आकाश
होजगे आणि स्मित शिंदे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जय लहुजीने
प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे निष्प्रभ केले. श्रीसाईकडून आकाश जैस्वालला मात्र
अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही.

Post a Comment
0 Comments