शनिवारी
कांदिवलीत रंगणार प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय कॅरमचा थरार!
राज्यातील
६४ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस
पहिले
१६ विजेते-उपविजेते स्ट्रायकरसह पुरस्कारांचे मानकरी
मुंबई
: बालदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात
आलेल्या सहाव्या प्रल्हाद नलावडे स्मृती चषक १४ वर्षांखालील शालेय कॅरम
स्पर्धेत विजेतेपदाचा चषक पटकाविण्यासाठी राज्यातील ६४ शालेय कॅरमपटूंमध्ये
चुरस रंगणार आहे. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी,
शशिकला फाउंडेशन आणि अविनाश नलावडे स्पोर्ट्स
यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, १४
नोव्हेंबर रोजी ही विनाशुल्क स्पर्धा साईनगर, कांदिवली
पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूल सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा
सिनको प्लॅटिनम चॅम्पियन कॅरम बोर्डवर खेळविण्यात येणार आहे.
महापौर
चषक विजेता केवल कुळकर्णीच्या लढतीने उद्घाटन!
यंदाच्या
मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेचा विजेता केवल कुळकर्णी आणि
बीएमसी-मुंबई पब्लिक स्कूल, कांदिवलीचा
सार्थक सिंग यांच्यातील उद्घाटनीय लढतीने स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे.
मुख्याध्यापक संदिपान घुले, कॅरमप्रेमी अविनाश
नलावडे, शशिकला फाउंडेशनचे प्रमुख रामेश्वर लोहे,
क्रीडापटू गोविंदराव मोहिते आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त लीलाधर
चव्हाण आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे.
राज्यातील
नामवंत शालेय कॅरमपटूंचा सहभाग!
स्मृती
चषकावर नाव कोरण्यासाठी आयडियल शालेय कॅरम स्पर्धेचा विक्रमी विजेता प्रसन्न
गोळे (पोद्दार अकॅडमी, मालाड),
केवल कुळकर्णी (एसकेकेई स्कूल, मुलुंड),
भरत सावंत (आरपीडी स्कूल, सावंतवाडी),
हर्षित शिंदे (संकल्प व्हॅली स्कूल, पुणे),
निधी सप्रे (विश्वनाथ विद्यालय, राजापूर),
नक्ष वैती (नोत्रे दमे स्कूल, वसई),
अनय म्हेत्रे आणि शिवांश मोरे (पाटकर विद्यालय, डोंबिवली), दुर्वेश चव्हाण (पार्ले टिळक
विद्यालय), विहा राणे (केंद्रीय विद्यालय, भांडूप), गौरी सावंत (जे. बी. वाच्छा स्कूल) आणि आरव आंजर्लेकर (शारदाश्रम विद्यामंदिर) यांच्यासह
बीएमसी-मुंबई पब्लिक स्कूल, साईनगर-कांदिवलीचे खेळाडूही आपले
कौशल्य पणाला लावणार आहेत.
खेळाडूंच्या
प्रतिसादामुळे पुरस्कारांची संख्या वाढवली!
शालेय
खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी पुरस्कारांमध्ये वाढ करण्याचा
निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या आणि उपविजेत्या
खेळाडूंना आकर्षक पुरस्कारांसह स्ट्रायकर देऊन गौरविण्यात येणार आहे.
बालदिनानिमित्त शालेय कॅरमपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा
नवोदित खेळाडूंसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments