पालघरमध्ये
२८ नोव्हेंबरपासून पाचवी राष्ट्रीय बेंचरेस्ट नेमबाजी स्पर्धा!
आंतरराष्ट्रीय
ख्यातीच्या ट्रायोचे प्रायोजकत्व
नवोदित
नेमबाजांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षणानंतर
राष्ट्रीय खुली स्पर्धा
मुंबई
: अचूकता, एकाग्रता
आणि कमालीच्या संयमाची कसोटी पाहणाऱ्या बेंचरेस्ट नेमबाजीचा थरार पालघरमध्ये
रंगणार आहे. अमॅच्युअर बेंचरेस्ट शूटर्स असोसिएशन (अब्सा) यांच्या वतीने
आयोजित करण्यात आलेली पाचवी राष्ट्रीय एअर रायफल खुली बेंचरेस्ट शूटिंग स्पर्धा
२८ आणि २९ नोव्हेंबर रोजी पालघर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समीर पाटील
शूटिंग स्पोर्ट्स अकादमी, गोवाडे येथे होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय शूटिंग रेस्ट उत्पादक ट्रायो
या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
अचूकतेचा
कस पाहणारा नेमबाजीचा प्रकार
बेंचरेस्ट
नेमबाजी हा जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि अचूकतेला सर्वोच्च महत्त्व देणारा
नेमबाजीचा प्रकार मानला जातो. या प्रकारात नेमबाजाचे कौशल्य,
एकाग्रता, तंत्र आणि सातत्य यांची कसोटी
लागते. दर दोन वर्षांनी आयोजित होणाऱ्या जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये ६२ पेक्षा
अधिक देशांतील आंतरराष्ट्रीय नेमबाज सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करतात.
नवोदितांना
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शनाची संधी
भारतीय
नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळावे,
यासाठी अब्सा सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेचे
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेमबाज भारतीय खेळाडूंना या प्रकारातील तांत्रिक बारकावे
समजावून सांगतात. यंदाच्या स्पर्धेच्या निमित्तानेही नामवंत प्रशिक्षक नवोदित
नेमबाजांना बेंचरेस्ट नेमबाजीचे तंत्र, कौशल्य आणि आवश्यक
बाबींचे मार्गदर्शन करणार आहेत. अनुभवी नेमबाजांच्या सहभागामुळे नव्या खेळाडूंना
प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळणार आहे.
प्रशिक्षणानंतर
प्रत्यक्ष स्पर्धेचा थरार
दोन
दिवसांच्या या उपक्रमात प्रथम नेमबाजांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सत्र आयोजित
करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष
बेंचरेस्ट नेमबाजी स्पर्धा होईल. त्यामुळे नवोदितांना शिकलेल्या तंत्राचा
प्रत्यक्ष स्पर्धेत उपयोग करण्याची संधी मिळणार आहे.
प्रमाणपत्रे,
पदके आणि आकर्षक पारितोषिके
स्पर्धेत
सहभागी होणाऱ्या प्रत्येक नेमबाजाला अमॅच्युअर बेंचरेस्ट शूटर्स असोसिएशनतर्फे
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नेमबाजांना
आयोजकांकडून पदके, स्मृतिचिन्हे
आणि अन्य आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात
येणार आहे.
नोंदणीसाठी
आवाहन
या
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नेमबाजांनी लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी
करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नोंदणीसाठी पुढील लिंकचा वापर करावा : https://forms.gle/EuGqfW17Z3t151UH9
अधिक
माहितीसाठी ९८२००५६०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
स्पर्धेचा
तपशील
- स्पर्धा : पाचवी राष्ट्रीय एअर रायफल खुली बेंचरेस्ट शूटिंग
स्पर्धा
- दिनांक : २८ व २९ नोव्हेंबर
- स्थळ : समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स अकादमी,
गोवाडे, पालघर–मनोर मार्ग, पालघर
- प्रायोजक : ट्रायो
- आयोजक : अमॅच्युअर बेंचरेस्ट शूटर्स असोसिएशन (अब्सा)

Post a Comment
0 Comments