खेलो इंडीया सायकलिंग वुमेन्स लीग
महाराष्ट्राच्या मुलींचे स्पर्धेवर निर्वीवाद वर्चस्व
बारामती येथे संपन्न झालेल्या खेलो इंडीया वुमेन्स लीग सायकल स्पर्धेवर महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्णपणे वर्चस्व राखले. आज झालेल्या तीनही स्पर्धेतील नऊ पदके महाराष्ट्राच्या मुलींनी जिंकली. महाराष्ट्राच्या प्रणिती सोमण हिने या स्पर्धेतील सलग दुसरे पदक पटकावताना रोड रेस प्रकारात कांस्य पदक पटकावले. महाराष्ट्राने या स्पर्धेत एकूण ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ६ कांस्य पदके पटकावली.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते जयदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दैनिक बित्तमबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर, साकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, या स्पर्धेचे मुख्य रेफ्री धरमेंदर लांबा, सुदाम रोकडे, दीपाली पाटील,मिनाक्षी, शिंदे, मिलींद झोडगे, मिनाक्षी ठाकूर, बिरु भोजने आदी मान्यवर हजर होते.
महिलांच्या २० कीमी टाईम ट्रायल प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू संगमनेरची प्रणिता सोमण हीने ३१.१७.८११ वेळ देत सुवर्णपदक पटकावले, रौप्य पदक अहमदनगरच्या अपूर्वा गोरे हिने हिने ३३.००.३९२ वेळेसह मिळवले तर कांस्ट पदक पुणेयाच्या मनाली रत्नोजीने ३३.०३.६२४ वेळेसह मिळवले.
महिलांच्या ४२ किमी रोड रेस स्पर्धेत पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीची राफ्ट्रीय सायकलपट्टू आदिती डोंगरे हीने सुवर्णपदक पटकावताना १.२३.२१.३३१ वेळ दिली, सांगलीच्या योगेश्वरी कदमने १.२३.२२.६३० वेळ देत रौप्य पटकावले तर स्पर्धेमधील आपले दुसरे पदक पटकावताना प्रणिता सोमणने १.२३.२३..३० वेळसह कांस्यपदक मिळवले.
मुलींच्या सब ज्युनीअर गटात पुण्याच्या आभा सोमण हिने १४ कीमी रोड रेस प्रकारात २५.२३.८९० वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, रौप्य पदकावर पुण्याच्याच गायत्री तांबवेकरने आपले नांव लिहताना २५.३०.४०० वेळ दिली, कांस्यपदक २५.३२.१८० वेळेसह पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रीय सायकलपट्टू श्रावणी परीट हिने मिळाले.
वुमेन ज्युनीअऱ वयोगटात २८ किमी रोड रेस प्रकारात कोल्हापूरच्या श्रुष्टी कुंभोजे हिने ५९.३२.०५१ वेळेसह सुवर्णपदक पटकावले, रौप्यपदक क्रीडा प्रबोधिनीची राष्ट्रीय सायकलपट्टू आसावरी राजमाने हिने १.०१.०९.७३० वेळ देत पटकावले, कांस्यपदक जळगांवच्या आकांक्षा म्हेत्रेने १.०१.११.०९० वळेसह मिळवले.

Post a Comment
0 Comments