Type Here to Get Search Results !

संजय मांडे - काजल कुमारी पालक मंत्री चषकाचे मानकरी

 


संजय मांडे - काजल कुमारी पालक मंत्री चषकाचे मानकरी 

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्षमी हॉल, कुडाळ, सिंधुदुर्ग येथे संपन्न झालेल्या पालक मंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अनुभवी आणि बिगर मानांकित मुंबईच्या संजय मांडेने ठाण्याच्या झैद अहमदला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करून पालक मंत्री चषकावर आपले नाव कोरले. पहिला सेट संजयने १६-६ अशा फरकाने जिंकला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये झैदने संजय मंडेला डोके वर काढू दिले नाही. झैदने दुसरा सेट २५-० असा एकतर्फी जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये सुरुवातीपासूनच झैदने आघाडी घेतली होती. सहाव्या बोर्ड नंतर झैदकडे १८-७ अशी आघाडी आघाडी होती. परंतु शेवटच्या दोन बोर्डात संजयने ११ गुण मिळविले. आठव्या बोर्डनंतर १८-१८ असे दोनही खेळाडूंचे सामान गुण झाल्याने अतिरिक्त ९ वा बोर्ड खेळविण्यात आला. नाणेफेकीचा कौल झैदने जिंकून बोर्डाची सुरुवात केली. परंतु आपल्या अनुभवाच्या जोरावर संजयने या बोर्डात ४ गुण मिळविले आणि २२ -१८ असा अंतिम सेट जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महिलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला. या सामन्यात मुंबईच्या अनुभवी काजल कुमारीने ठाण्याच्या मधुरा देवळेवर २५-५, २५-८ अशी सहज मात करून विजय प्राप्त केला. 


पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या पंकज पवारवर २१-१९, २५-१३ असा विजय मिळविला. तर महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या रिंकी कुमरीने युथ राष्ट्रीय विजेत्या समृद्धी घाडिगावकरवर ६-२३, १९-१८ व २१-१४ असा अनपेक्षित विजय नोंदविला. 

तत्पूर्वी झालेल्या पुरुषांच्या उपांत्य लढतीत संजय मांडेने पुण्याच्या सागर वाघमारेला २५-९, ०-२५ व २५-१ असे तर झैदने मुंबईच्या पंकज पवारवर २३-८, ३-२५ व १९-१८ असे नमविले होते. तर महिलांच्या उपांत्य सामन्यात काजलने ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला १४-१, २५-२० असे तर मधुरा देवळेने रिंकी कुमारीवर १४-२५, १५-८ व १८-१५ असे पराभूत केले होते. 

विजेत्या खेळाडूंना भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष  प्रभाकर सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट अवधूत भणगे यांच्या शुभ हस्ते चषक व रोख पारितोषके देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी जनता पार्टीचे रणजीत देसाई, बंड्या सावंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील धुरी, सचिव योगेश फणसळकर, खजिनदार शुक्राचार्य  म्हाडेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments