Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्राचे शानदार यश

 


राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्राचे शानदार यश

मुंबई: वास्को-गोवा येथील रवींद्र भवनमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करताना विविध गटांत एकूण चौदा सांघिक जेतेपदं मिळवली. ही स्पर्धा पॉवरलिफ्टिंग इंडिया आणि गोवा सुपर बॉडीज पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

या क्लासिक बेंच स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनियर, आणि मास्टर्स पुरुष व महिलांच्या गटात आपली चमकदार कामगिरी सादर केली. अनेक पुरुष व महिला खेळाडूंनी भरघोस पदकांची कमाई केली, ज्यामुळे महाराष्ट्र संघाला एकूण 14 सांघिक विजेतेपदं मिळाली.

महाराष्ट्राच्या या शानदार यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई आणि राज्य संघटनेच्या उपाध्यक्षा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रक्षा महाराव यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. या सर्व खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अनंत चाळके आणि सूर्यकांत गद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. संघाचे व्यवस्थापक अरुण पाटकर होते.

Post a Comment

0 Comments