Type Here to Get Search Results !

एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धा आरवसह अर्जुनचे आव्हान संपुष्टात

 


एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धा

आरवसह अर्जुनचे आव्हान संपुष्टात

 

मुंबई, 24 ऑक्टोबर: एमएसएलटीए-सीसीआय अखिल भारतीय रँकिंग टेनिस स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात दुसरा मानांकित आरव छल्लानी आणि तिसरा मानांकित अर्जुन मणिकानंद यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

 

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत बुधवारी दुसऱ्या मानांकित आरवला 11व्या मानांकित अहान जैनने 6-2, 1-6, 6-4 असे हरवले. नववा सीडेड माधव दधीचने तिसरा सीडेड अर्जुन मणिकानंदवर 6-2, 6-1 अशी सरळ सेटमध्ये मात केली. आरवसह अर्जुनला बाहेरचा रस्ता धरावा लागला तरी सातवा सीडेड अंश रामानी आणि बिनसीडेड माहीन झवेरीने अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

 

मुलींच्या गटात पहिल्या तीन सीडेड खेळाडूंनी आगेकूच केली. अव्वल मानांकित आराध्या मीना आणि तिसरी मानांकित पद्मा रमेशकुमारने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ सेटमध्ये हरवले. दुसऱ्या सीडेड जान्हवी तम्मिनेदीला बिनसीडेड जानकी रविकुमारने झुंजवले, परंतु चौथ्या सीडेड आयशा बागलाला बिनसीडेड कृशिका गौतमकडून पराभवाचा धक्का बसला.

 

निकाल –

14 वर्षांखालील मुले (उपांत्यपूर्व फेरी):

7- अंश रामाणी विजयी वि. आरव मुळ्ये 4-6, 6-2, 7-5;

माहिन झवेरी विजयी वि. कियान पटेल 2-6, 6-1, 6-2;

9- माधव दधीच विजयी वि. 3- अर्जुन मणिकानंद 6-2, 6-1;

11- अहान जैन विजयी वि. 2- आरव छल्लानी 6-2, 1-6, 6-4.

 

मुली (उपांत्यपूर्व फेरी):

1-आराध्या मीना विजयी वि. 6- कीर्तियानी घाटकर 6-1, 6-2;

कृशिका गौतम विजयी वि. 4- आयशा बागला 2-6, 6-2, 6-3;

3- पद्मा रमेशकुमार विजयी वि. आयुश्री तरंगे 6-1, 6-2;

2- जान्हवी तम्मिनेदी विजयी वि. जानकी रविकुमार 0-6, 6-0, 7-6(5).


Post a Comment

0 Comments