३४वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा
महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट
साताऱ्याचा प्रसाद बळीप भरत पुरस्काराचा तर
सांगलीची वेदिका तामखडे इला पुरस्काराची मानकरी
सिमडेगा, झारखंड दि. २
ऑक्टोबर, पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू
असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या
किशोर व किशोरी संघाने विजेतेपदासह दुहेरी
सुवर्ण मुकुट संपादला. किशोर गटाचे हे सलग ९वे तर किशोरी गटाचे ७ वे विजेतेपद आहे.
साताराच्या प्रसाद बळीपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार तर सांगलीच्या
वेदिका तामखडेला इला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा हा मुलांचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा व चुरशीचा झाला.
या सामन्यात मध्यंतराला १ गुणाने पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने हा सामना अखेर २४-१५
असा ९ गुणांनी जिंकला. महाराष्ट्रा कडून भीमसिंग वसावे २ मि. संरक्षण व १ गडी, श्री दळवी १.१० मि. संरक्षण व १ गडी,
प्रसाद बळीप १, २ मि. संरक्षण व ३ गडी,
सचिन थोरात १.१०, १ मि. संरक्षण व १ गडी,
विनायक भांगे १.२० मि. संरक्षण अशी सांघिक कामगिरी करत हा सामना
जिंकला. तर तेलंगणाच्या सुंदरने १ मि. संरक्षण करून ८ गडी बाद करून सामन्यात चुरस
निर्माण केली होती.
महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८
गुणांनी सहज विजय मिळवला. मध्यंतराला १४-४ अशी आघाडी घेत महाराष्ट्रने २६-८ असा
सामना जिंकला. महाराष्ट्राकडून वेदिका तामखडेने पहिल्या डावात ५ मिनिटे संरक्षण
केले. तिला सिद्धी भोसले १.३० मि. संरक्षण ३.५० मि. संरक्षण व ५ खेळाडू बाद करत
मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद ३ मि. संरक्षण करताना २ खेळाडू बाद केले तर गौरी जाधवने ३ खेळाडू बाद केले. तर कर्नाटकच्या
इंच्रा २, १.५ मि. संरक्षण करून 4 खेळाडूंना बाद केले
व गौतमीने १, १.४० मि. संरक्षण करून चांगली लढत दिली.
या सामन्यानंतर प्रशिक्षक
व व्यवस्थापक यांनी विजयाचे श्रेय खेळाडूंना दिले. तर भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव
व महाराष्ट्र खो खो असो. सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंचे दुहेरी
विजेतेपदाबद्दल तोंड भरून कौतुक केले. तसेच महाराष्ट्र खो खो असो. अध्यक्ष
संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, संदीप
तावडे व इतर पदाधिकाऱ्यांनी या छोट्या खेळाडूंचे भरभरून कौतुक केले.
.jpeg)

Post a Comment
0 Comments