इनडोअर क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज
४० वर्षावरील
गटात अंतिम सामन्यात
युएईचा द.
आफ्रिकेवर २५ धावांनी विजय
कोलंबो, ०५ ऑक्टोबर, (क्री.
प्र.) : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने
सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या सहकार्याने इनडोअर
क्रिकेट मास्टर्स वर्ल्ड सिरीज ऑस्टेशिया स्पोर्ट्स क्लब, थलावाथुगोडा,
कोलंबो, श्रीलंका येथे सुरु आहे. हि स्पर्धा
मनीष किशोर यांच्या यु प्रो. या कंपनीने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशनने एकत्रीत
आयोजित केली आहे. या स्पर्धेत चाळीस वर्षांवरील पुरुष गटात युएईने द. आफ्रिकेचा
७४-४९ असा २५ धावांनी विजय साजरा करत मास्टर्स वर्ल्ड सिरीज जिंकली. प्रथमच या
गटात ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड हे संघ अंतिम सामन्यात पोहचू शकले नाहीत.
आज झालेल्या अंतिम
सामन्यात युएईच्या चाळीस वर्षांवरील पुरुष संघाने द. आफ्रिकेवर थरारक विजय मिळवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युएईने पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके) कर्णधार थरिंदू
मेंडीस (१५ धावा) व रोहन नायक (६ धावा, १ विकेट) यांनी २१ धावा केल्या तर दुसऱ्या
स्कीन मध्ये (चार षटके) उपकर्णधार विक्रांत शेट्टी (९ धावा) व झी नवाझ (९ धाव, ४
विकेट) यांनी १८ धावा केल्या तर तिसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) क्रीशांचंद्रा कराते
(२ धावा) व प्रसाथ कुमारा (१८ धावा, १
विकेट) यांनी २० धावा केल्या तर चौथ्या व शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) स्याम
चंद्रभानू ( व मित दलाल यांनी १५ धावांची
भर घालत द. आफ्रिकेला ७५ धावांचे आव्हान दिले.
यानंतर आलेल्या द.
आफ्रिके संघाने जोरदार लढत देताना पहिल्या स्कीन मध्ये (चार षटके) अन्द्रिएस रूयेन
(९ धावा, १ विकेट) व आंद्रे रेन्सबुर्ग (१० धावा, १ विकेट) यांनी १९ धावा केल्या.
दुसऱ्या स्कीन मध्ये (चार षटके) कर्णधार जाको स्वार्ट (७ धावा, १ विकेट) व जाको
एरास्मुस (० धावा व १ विकेट) यांनी ७ धावा केल्या व तिसऱ्या स्कीन मध्ये (चार
षटके) आलेल्या उपकर्णधार युगेने स्वार्ट (११ धावा, १ विकेट) व रेजेअन डामोन ( ८ धावा, १
विकेट) यांनी १९ धावांची भर घातली. तर चौथ्या व शेवटच्या स्कीन मध्ये (चार षटके) इग्नेस
इंग्राम (वजा ४ धावा व २ विकेट) व वॉघन बेर्केल (८ धावा) यांनी दिलेली लढत अपयशी
ठरली.
या सामन्यात सुरवातीपासूनच
युएईने आक्रमक खेळ करत सामना खिशात घातला. त्याचा कर्णधार थरिंदू मेंडीसने सामना
संपल्यावर आम्ही केलेल्या नियोजनानुसार खेळ केला व युएईला विजय मिळवून दिल्याचे
सांगितले.


Post a Comment
0 Comments