Type Here to Get Search Results !

जे. एस. परेरा स्मृती एआयटीए टेनिस स्पर्धा अव्वल सीडेड विष्णू वर्धनची विजयी सलामी

 


जेएसपरेरा स्मृती एआयटीए टेनिस स्पर्धा

अव्वल सीडेड विष्णू वर्धनची विजयी सलामी

मुंबई : टॉप सीडेड विष्णू वर्धनने बान्द्रा जिमखाना आयोजित २.५ लाख रुपयांच्या जे. एस. पेरेरा स्मारक एआयटीए टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत संदेश कुवळेचा ६-२, ७-५ असा सहज पराभव केला. ही स्पर्धा मंगळवारी बान्द्रा जिमखाना टेनिस कोर्टवर खेळली गेली.

एक अत्यंत चुरशीच्या सामन्यात, अझमेर शेखने चौथ्या सीडेड धीरज कोंडांचाचा तीन सेटमध्ये ७-६(९), ५-७, ६-४ असा पराभव केला.

इतर सामन्यात, रिदम मल्होत्राने सुनीत लंका याचा ३-६, ६-४, ६-४ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

एका एकतर्फी सामन्यात, सॅम्युअल राशेनने जतीन नैनवरचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला.


Post a Comment

0 Comments