Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा नितेश, ओजसचे शानदार विजय

 


रोटरी क्लब रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धा 

नितेश, ओजसचे शानदार विजय

मुंबई, रोटरी भवन, डोंबिवली पूर्व येथे आज पुरुष एकेरी गटाने सुरु झालेल्या रोटरी क्लब रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे उदघाट्न रोटरी क्लब ऑफ ठाण्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या शुभहस्ते करण्यात आले. . पुरुष एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत पालघरच्या नितेश बाबारियाने मुंबईच्या बाळासाहेब कनुकलेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-१९, १६-२ व १८-९ असे पराभव केले. तर मुंबईच्या ओजस जाधवने मुंबईच्याच संदीप जोगळेवर ११-९, १६-१ अशी मात करत आगेकूच केली. 


पुरुष एकेरी दुसऱ्या फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे 


अभिजित त्रिपनकर  ( पुणे ) वि वि संदेश वरगडे ( मुंबई उपनगर ) २५-१०, २५-११

जितेश कदम ( मुंबई उपनगर ) शंकर सावर्डेकर ( मुंबई ) २५-१, २५-६

गौरव हुदळे ( कोल्हापूर ) वि वि सुपेश कामतेकर ( मुंबई ) १७-१५, १४-१९, १३-१०

ओंकार नेटके ( मुंबई ) वि वि सीराम चक्का ( मुंबई उपनगर ) ४-२५, २२-११, २५-५

राहुल सोळंकी ( मुंबई ) वि वि भारत मकवाना ( ठाणे )  २५-०, १७-४ 

संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि शिरीष मुदगल ( मुंबई ) २५-१८, २५-८

शोएब पटेल ( मुंबई उपनगर ) वि वि राजेश रिकामे ( मुंबई ) १७-४, ८-२१, १८-५

सचिन पवार ( पालघर) वि वि महेश सांडीस ( मुंबई) २१-४, ४-१९, १६-११

जावेद  सय्यद ( मुंबई उपनगर ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) ११-९, ११-१७, १७-१२

Post a Comment

0 Comments