आकांक्षा कदम - अभिजित त्रिपनकरची उपांत्य फेरीत धडक
मुंबई, रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने सुरु असलेल्या रोटरी क्लब रॅपिड कॅरम सुपर सिक्स स्पर्धेतील उप उपांत्य फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने मुंबई उपनगरच्या संजय मणीयारला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. महिला गटात उप उपांत्य लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर पहिला सेट गमावल्यानंतर पुढील दोन सेट असे सहज जिंकून उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे
झैद अहमद फारुकी ( ठाणे ) वि वि समीर अन्सारी ( ठाणे )
विकास धारिया ( मुंबई ) वि वि विश्वनाथ देवरुखकर ( मुंबई उपनगर )
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि पंकज पवार ( ठाणे )
महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
अंबिका हरिथ ( मुंबई ) वि वि ऐशा साजिद खान ( मुंबई )
समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि उर्मिला शेंडगे ( मुंबई )
प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) वि वि संगीता चांदोरकर ( मुंबई )

Post a Comment
0 Comments