एमसीए कार्पोरेट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा
जैन इरिगेशनचा रूट मोबाईलवर 10 धावांनी विजय
मुंबई, 16 नोव्हेंबर: मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कार्पोरेट ट्रॉफी टी-ट्वेन्टी
क्रिकेट स्पर्धेच्या ए डिव्हिजनमध्ये जैन इरिगेशन अ संघाने रूट मोबाईलवर 10
धावांनी विजय मिळवला.
वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात रूट मोबाईलने
नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन अ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जैन
इरिगेशन अ संघाने 20 षटकांत
6 बाद 218 धावा केल्या. त्यात कर्णधार
जय बिश्तच्या (53 चेंडूंत 85 धावा,
6 चौकार, 5 षटकार) दमदार खेळीचा मुख्य वाटा
होता. त्याला साईराज पाटील (23 चेंडूंत 47 धावा, 1 चौकार, 5 षटकार) आणि
आयुष झिमरे (21 चेंडूंत 45 धावा,
4 चौकार, 3 षटकार) यांनी उत्तम साथ दिली. रूट
मोबाईलकडून सक्षम झा (3-31) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
रूट मोबाईलने जैन इरिगेशनचे 218 धावांचे लक्ष्य 20 षटकांत 6 बाद 208 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ध्रुमिल
मटकर (36 चेंडूंत 55 धावा, 8 चौकार, 1 षटकार) आणि भार्गव पाटील (28 चेंडूंत 46 धावा) यांच्या झटपट खेळीनंतर 8.4 षटकांत 81 धावांची साझेदारी झाली. तथापि, मधल्या फळीतील उमेश गुर्जर (21 चेंडूंत 38 धावा, 3 चौकार, 2 षटकार) याने
थोडा प्रतिकार केला, पण इतर फलंदाजांनी निराशा केली.
जैन इरिगेशन कडून जगदीश झोपे (3-34) आणि प्रशांत सोळंकी (2-37) यांनी प्रभावी गोलंदाजी करत जैन इरिगेशनला 10 धावांनी
विजय मिळवून दिला.
Post a Comment
0 Comments