महिला एकेरीतील चार
टॉप सीडेड खेळाडूंचे आव्हान संपुष्टात
मुंबई, 16 नोव्हेंबर:
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (MBA) च्या मान्यतेने तसेच ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (GMBA) आणि
एनएससीआय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र
राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा मध्ये महिला एकेरीतील चार अव्वल मानांकित खेळाडूंचे आव्हान
संपुष्टात आले.
विलिंग्डन
स्पोर्ट्स क्लबच्या कोर्टवर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत टॉप
सीडेड शिवानी हेर्लेकरला बिगरमानांकित अनुष्का भिसेने 17 मिनिटांत
29-30
अशा पराभवाचा सामना करावा लागला.
उपांत्यपूर्व
फेरीतील इतर लढतीत, श्रावणी पाटीलने दुसऱ्या मानांकित श्रद्धा हाक्केला 15-9, 15-8 अशा
सरळ गेममध्ये पराभूत केले. तिसऱ्या मानांकित मनस्वी वैद्यला बिगरमानांकित देवांशी
शिंदेने 13-15, 15-2 अशी मात दिली. याच वेळी, प्रिशा शाहने
चौथ्या मानांकित नेत्रा झलानीविरुद्ध पहिला गेम गमावूनही, 8-15, 15-7,
15-2 असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.
पुरुष
एकेरीच्या क्वार्टरफायनलमध्ये अव्वल मानांकित तनय मेहेंदळेने मिशिल शाहवर 17-15, 15-11 असा
विजय मिळवला, तर दुसऱ्या मानांकित श्वेतांक कर्णिकने पियुष कांबळेवर 15-11, 15-10 अशी
मात केली.
युवा खेळाडू
हर्षित माहीमकरने तिसऱ्या मानांकित यश तिवारीला 15-7, 15-5 असा सरळ
गेममध्ये पराभूत करून अंतिम चार खेळाडूंच्या गटात स्थान मिळवले. चौथ्या मानांकित
सोहम फाटकने तनय जोशीला 15-11, 15-8 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
निकाल:
महिला एकेरी - उपांत्यपूर्व फेरी:
- प्रिशा
शाह विजयी vs. नेत्रा झलानी (8-15, 15-7, 15-2)
- अनुष्का
भिसे विजयी vs. शिवानी हेर्लेकर (29-30)
- श्रावणी
पाटील विजयी vs. श्रद्धा हाक्के (15-9, 15-8)
- देवांशी
शिंदे विजयी vs. मनस्वी वैद्य (15-13, 15-2)
पुरुष एकेरी - उपांत्यपूर्व फेरी:
- श्वेतांक
कर्णिक विजयी vs. पियुष कांबळे (15-11, 15-10)
- सोहम
फाटक विजयी vs. तनय जोशी (15-11, 15-8)
- हर्षित
माहीमकर विजयी vs. यश तिवारी (15-7, 15-5)
- तनय
मेहेंदळे विजयी vs. मिशिल शाह (17-15, 15-11)
Post a Comment
0 Comments