मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा
राहुल सचदेवचा अनंत मेहताविरुद्ध 3-1 असा विजय
मुंबई, १५ नोव्हेंबर: राहुल सचदेवने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धेतील बेस्ट ऑफ फाईव्ह फ्रेम '१५-रेड' स्नूकर राऊंड-रॉबिन सामन्यात अनंत मेहताविरुद्ध ३-१ असा विजय नोंदवला.
एमईचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत डावखुरा क्युईस्ट राहुल सचदेवने पहिल्या आणि दुसऱ्या फ्रेममध्ये अनुक्रमे ६५ आणि ५६ अशा दोन अर्धशतकांसह ७०-०, १८-६१, ६२-४७ आणि ३८-२० अशी प्रभावी ब्रेक केली. मेहताने दुसरी फ्रेम जिंकताना पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण त्याला त्याचे सातत्य राखता आले नाही.
दरम्यान, युधिष्ठिर जयसिंगने (क गट) निखिल आहुजाचा ३-१ (३४-७७, ६५-२८, ५९-३६, ६५-२०) असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला आणि बाद फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली.
रंगतदार लढतीत ठाण्याचा क्यूईस्ट अनुज अग्रवालने मराठवाड्याच्या स्वप्नील पाटीलवर ३-२ (५४-२२, ६०-१९, ४७-७३, ३३-६१, ४७-१४) अशी मात केली.
निकाल - १५-रेड स्नूकर:
- शाहयान राझमी विजयी वि. कृष्णा तोहगावकर (ठाणे) ३-१ (६५-४८, ४६-५०, ६३-३८, ५८-३६)
- सुमीत आहुजा (उल्हासनगर) विजयी वि. गौरव जयसिंघानी (वाशी) ३-१ (४३-५२, ६७-३४, ६५-४९, ६५-३४)
- निखिल सैगल विजयी वि. अनुराग शर्मा (मराठवाडा) ३-० (७६-१६, ५८-४८, ५७-२५)
- सोनू मातंग (पुणे) विजयी वि. प्रशांत डुंभेरे ३-० (७९(५६)-११, ७७-३, ६३-२५)
- अभिषेक बजाज विजयी वि. पियुष लिंबड ३-१ (४०-५९, ४७-३७, ६०-३४, ९९(३१)-२४)
- अभिजीत रानडे (पुणे) विजयी वि. अक्षय वाघचौरे (नाशिक) ३-० (६६-६२, ६०-१९, ६१-३९)
- आदित राजा विजयी वि. ऋषभ जैन ३-२ (८२-४२, ३४-७३, ५८-३९, ५०-६५(५४), ८२-७९)
- जुबेर शेख (नागपूर) विजयी वि. चिराग रामकृष्णन ३-० (५४-२१, ५८(३२)-५४, ५८-४८)
- सुनील जैन विजयी वि. चेतन राजरवाल (मराठवाडा) ३-० (६७-२९, ७३-१७, ८०-२१)
फोटो कॅप्शन: राहुल सचदेव
Post a Comment
0 Comments