महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा २०२४
हर्षित माहीमकरची वीर भदाणेवर सहज मात
मुंबई, 15 नोव्हेंबर: दुसऱ्या मानांकित हर्षित माहीमकरने एनएससीआय
आयोजित योनेक्स सनराइज-महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धेत 17
वर्षांखालील मुले एकेरीच्या राऊंड ऑफ 32
फेरीतील सामन्यात वीर भदाणेवर केवळ 11
मिनिटांत 30-8 असा सहज विजय मिळवला.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने
बृहन्मुंबई बॅडमिंटन असोसिएशन आयोजित एनएससीआय कोर्टवर खेळल्या जात असलेल्या या
स्पर्धेत अन्य सामन्यात अव्वल मानांकित तनय मेहेंदळेने बिगरमानांकित अर्जुन पवारचे
आव्हान 17
मिनिटांत 30-22 असे मोडीत काढले.
तिसऱ्या मानांकित इशान वानखेडेने मीत उधोजीला 17
मिनिटांत 30-18 असे पराभूत केले. चौथ्या मानांकित निधिश मोरेने सोहम
तांबेविरुद्ध 22 मिनिटांत
30-24
असा विजय मिळवला.
महिला एकेरीत, तिसऱ्या मानांकित मनस्वी वैद्यने पूजा पुप्पाला अवघ्या 10
मिनिटांत 30-14 असा सहज पराभव केला. अपूर्वा घाडगेने काव्या थनुकृष्णनला 18
मिनिटांत 30-27 असे हरवले.
निकाल
– 17 वर्षांखालील मुले
एकेरी (राऊंड ऑफ 32 फेरी)
- तनय मेहेंदळे विजयी वि. अर्जुन पवार 30-22
- प्रफुल पारडी विजयी वि. वत्सल तिवारी 30-18
- तनय जोशी विजयी वि. वेदांत सावंत 30-21
- निधिश मोरे विजयी वि. सोहम तांबे 30-24
- अयान कपाडिया विजयी वि. राजगुरू गरड 30-21
- सुमित माडे विजयी वि. अनय पिंगुळकर 30-19
- हृषिकेश कोळंबेकर विजयी वि. शिवम चौरे 30-23
- इशान वानखेडे विजयी वि. मीत उधोजी 30-18
- इशान साळवी विजयी वि. अनन्या देशमुख 30-21
- नुमान शेख विजयी वि. मोहित कांबळे 30-27
- हर्षित माहीमकर विजयी वि. वीर भदाणे 30-8
महिला एकेरी (राऊंड ऑफ
32
फेरी)
- अनुष्का भिसे विजयी वि. पुष्टी कोलाडिया 30-20
- निराली पोखर्णा विजयी वि. मन्या कोटियन 30-21
- देवांशी शिंदे विजयी वि. पूर्वा बागकर 30-20
- अनन्या राणे विजयी वि. संजना महाराव 30-20
- मनस्वी वैद्य विजयी वि. पूजा पुप्पाला 30-14
- सिद्धी सोलंकी विजयी वि. इशिका चट्टीकल 30-27
- अपूर्वा घाडगे विजयी वि. काव्या थानुकृष्णन 30-27
फोटो
–
द्वितीय मानांकित हर्षित माहीमकरने
17
वर्षांखालील मुले
एकेरीच्या राऊंड ऑफ 32 फेरीतील सामन्यात वीर भदाणेचा 30-8
असा पराभव केला.
Post a Comment
0 Comments