सरला फायबर्स आणि टीम हार्मनीमध्ये फायनल
मुंबई, 15 नोव्हेंबर: टीम सरला फायबर्सने आपला विजयी फॉर्म कायम राखत ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) आणि बॉम्बे जिमखान्याद्वारे आयोजित प्राइम सिक्युरिटीज-राष्ट्रीय रँकिंग ब्रिज 2024 स्पर्धेच्या मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्यांची गाठ टीम हार्मनीशी पडणार आहे.
उपांत्य फेरीत सरला फायबर्स आणि हेक्सा स्क्वॉड यांच्यात चुरशीची लढत झाली. सरला फायबर्सने तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आणि 17 आयएमपींनी विजयी होऊन 19.5 आयएमपींसह अंतिम फेरीत स्थान मिळवले.
टीम हार्मनीने शानदार कामगिरी करत टीम जेसलला 20 आयएमपींनी पराभूत केले. हार्मनीने दुसऱ्या सत्रात 28 आयएमपींसह वर्चस्व राखत फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत सरला फायबर्सने 38 आयएमपींसह टीम वॉरियर्सला पराभूत केले. टीम जेसलने टीम स्नॅपड्रॅगनवर 24.5 आयएमपींनी मात केली, हार्मनीने टीम स्लॅमर्सवर 25 आयएमपींनी आणि हेक्सा स्क्वॉडने एसिंग इटवर 30.5 आयएमपींनी विजय मिळवला.
Post a Comment
0 Comments