Type Here to Get Search Results !

एमसीए महिला क्रिकेट स्पर्धा संध्या कांबळेचे झटपट शतक केआरपी इलेव्हन सीसीचा इंडियन डायनामाईटवर विजय

 


एमसीए महिला क्रिकेट स्पर्धा

संध्या कांबळेचे झटपट शतक

केआरपी इलेव्हन सीसीचा इंडियन डायनामाईटवर विजय

 

मुंबई, 13 नोव्हेंबरएमसीए महिला क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यात केआरपी इलेव्हन सीसीने इंडियन डायनामाईट सीसीवर 101 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली ती म्हणजे संध्या कांबळे व तिचे 108 धावांचे झटपट शतक.

 

संध्याने 84 चेंडूंत 19 चौकारांसह शतक झळकावले. तिच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर केआरपी इलेव्हन सीसीने 39.5 षटकांत 289 धावांची धावसंख्या उभारली. या सामन्यात चेतना कांबळेने सुध्दा 47 धावांची महत्त्वाची खेळी केली आणि संध्याला उत्तम साथ दिली.

 

इंडियन डायनामाईट सीसीला प्रत्युत्तर देताना केआरपी इलेव्हन सीसीच्या गोलंदाजांनी उत्तम मारा केला. इंडियन डायनामाईट सीसीचा डाव 39.4 षटकांत 188 धावांत संपला. तन्वी परबने 56 धावा करून सर्वाधिक धावांचे एकहाती योगदान दिले, मात्र ती एकटी संघाला विजयी मार्गावर घेऊन जाऊ शकली नाही. केआरपी इलेव्हन सीसीच्या चेतना कांबळेने 31 धावांत 3 विकेट्स घेत गोलंदाजीतही प्रभावी भूमिका बजावली.

 

संक्षिप्त धावफलक:

  • ग्लोरियस सीसी – 40 षटकांत 7 बाद 202 (साध्वी संजय 47, श्रद्धा शेट्टी 40; अदिती सुर्वे 3/37) विजयी वि. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन – 14.3 षटकांत सर्वबाद 55 (सारा सामंत 27; समृद्धी घारे 5/28, तृष्णा नारकर 3/13)

 

  • स्पोर्ट्सफिल्ड सीसी – 35.5 षटकांत सर्वबाद 118 (पुनम राऊत 57; ययाती गावड 3/22)
    विजयी वि. पालघर डहाणू तालुका एसए – 29.4 षटकांत सर्वबाद 83 (रिद्धी ठक्कर 4/14)

 

  • भारत सीसी – 33.1 षटकांत सर्वबाद 158 (काशीह निर्मल 36, अक्षी गुरव 32, धनश्री वाघमारे 28; वैष्णवी देसाई 5/35) पराभूत वि. दहिसर एससी – 39.1 षटकांत 9 बाद 161 (प्रियां गोलिपकर 75, अक्षी गुरव 3/21, लाजरी भोवर 3/35)

Post a Comment

0 Comments