मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्नूकर स्पर्धा
स्वामिनाथनला मागोला हरवत सिक्स-रेड स्नूकरचे विजेतेपद
मुंबई, 13 नोव्हेंबर: मुंबईच्या विनय स्वामिनाथनने सिक्स-रेड
स्नूकर प्रकारात उत्कृष्ट खेळ करत, अंतिम फेरीत सहकारी सुमेर
मागोला 6-4 ने हरवून मलबार हिल क्लब राज्य मानांकन स्पर्धेचे
विजेतेपद पटकावले.
स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईतील एमएचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये
बुधवारी खेळली गेली. स्वामिनाथनने सावध सुरुवात केली आणि तिसरी फ्रेम जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. त्याने पुढे सहावी
फ्रेम गमावली, पण त्यानंतर सातवी आणि आठवी फ्रेम जिंकून
त्याने पुनः आघाडी घेतली. मागोने आठव्या फ्रेममध्ये विजय मिळवून बरोबरी साधली,
परंतु स्वामिनाथनने पुढील दोन फ्रेम्स जिंकून जेतेपदावर
शिक्कामोर्तब केले.
15-रेड राऊंड-रॉबिन लीगचे निकाल:
- शिओक
अग्रवाल (नागपूर) 3-2 राहुल सचदेव
- अनंत मेहता 3-1 श्लोक अग्रवाल (नागपूर)
- शाहयान रझमी
3-1 आशित पंड्या (डोंबिवली)
- कृष्णा
तोहगावकर (ठाणे) 3-1 आशित पंड्या (डोंबिवली)
- चेतन
राजरवाल (मराठवाडा) 3-2 जुबेर शेख (नागपूर)
फोटो – स्वामिनाथन: मलबार हिल क्लब राज्य
रँकिंग स्नूकर स्पर्धेत ऑल-मुंबई ’6-रेड’ फायनलमध्ये विनय
स्वामिनाथनने सुमेर मागोचा 6-4 असा पराभव केला.
Post a Comment
0 Comments