Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धा 2024 दिल्लीच्या शर्मा आणि बत्रा जोडीने जिंकली प्राइम सिक्युरिटीज ब्रिज स्पर्धा

 


राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धा 2024

दिल्लीच्या शर्मा आणि बत्रा जोडीने जिंकली प्राइम सिक्युरिटीज ब्रिज स्पर्धा

मुंबई, 13 नोव्हेंबर: दिल्लीच्या आशा शर्मा आणि पूजा बत्रा या जोडीने प्राइम सिक्युरिटीज - राष्ट्रीय रँकिंग ब्रिज स्पर्धेतील (2024) महिला जोडी (लेडीज पेअर) प्रकाराचे जेतेपद पटकावले.

 

ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) आणि बॉम्बे जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेच्या अंतिम फेरीत १८ स्पर्धकांमध्ये त्यांचं वर्चस्व ठरलं. शर्मा आणि बत्रा या जोडीने ५६ आयएमपीसह जेतेपदाचा मान मिळवला.

 

मुंबईच्या उषा काबरा आणि कोलकात्याच्या भारती डे जोडीने ५० आयएमपीसह उपविजेतेपद मिळवले, तर दिल्लीच्या देवी भटनागर आणि अलका जैन जोडीने ३७ आयएमपीसह तिसऱ्या स्थानावर आपला ठसा उचलला.

 

विजेत्या शर्मा आणि बत्रा जोडीला ४०,००० रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले, तर काबरा-डे आणि भटनागर-जैन यांना अनुक्रमे ३०,००० आणि २०,००० रुपये बक्षीस मिळाले. याशिवाय स्पर्धेतील अव्वल आठ जोड्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.

 

लेडीज पेअर इव्हेंटनंतर, या आठवड्यातच मिश्र संघ (टीम) आणि मिश्र जोडी इव्हेंट्स देखील सुरू होणार आहेत.

 

अंतिम निकाल (टॉप-8 जोड्या):

१. आशा शर्मा आणि पूजा बत्रा

२. उषा काबरा आणि भारती डे

३. देवी भटनागर आणि अलका जैन

४. सुभाषश्री बसू आणि मीनल ठाकूर

५. अदिती झवेरी आणि मारियान करमरकर

६. बिंदिया कोहली आणि प्रिया बालसुब्रमण्यम

७. अंजली कार्तिकेयन आणि रितू बंगारिया

८. वीणा बॉब आणि रमणी मेनन


Post a Comment

0 Comments