राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा - २०२४
सुर्या थात्तु, पूजा दानोले महाराष्ट्र संघाचे कर्णधार
मुंबई., चेन्नई,
तामिळनाडू येथे १५ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान ७६वी
सिनीअर,
५८ज्युनिअर आणि ३९वी सब ज्युनीअर राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग
अजिंक्यपद स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होणा-या महराष्ट्र संघाच्या
कर्णधारपदी पुरुषांमध्ये आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू सुर्या थात्तु आणि महिलांमध्ये
आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपट्टू पूजा दानोले यांची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक सुदाम रोकडे यांच्या
अध्यक्षतेखालील प्रताप जाधव, प्रा. संजय साठे, श्रीमती दिपाली पाटील, मिलींद झोडगे आणि उत्तम नाळे यांच्या समितीने महाराष्ट्राचा
२१ पुरुष आणि २० महिला असा एकूण ४१ सायकलपट्टूंचा संघ जाहीर केला. मुख्य प्रशिक्षक
म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीमती दिपाली पाटील यांची
नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे :
पुरुष : मेन ईलीट: सूर्या थात्तू (कर्णधार), मंगेश ताकमोगे, वेदांत जाधव (तिघे पुणे), मंथन लाटे (ठाणे), वेदांत ताजने (नाशिक), विवान सप्रू (मुंबई)
मेन ज्युनिअर : साहिल शेटे, हरिष दिपक डोंबाळे समरजीत हरी थोरबोले (दोघे क्रीडा प्रबोधिनी पुणे),
सोहम पवार (दोघे पुणे), सक्षांत मोठे (सांगली)
बॉईज सब ज्युनिअर : सिद्धेश सर्जेराव घोरपडे ,ओंकार जोतिराम गांधले, प्रणय भागाण्णा चिनगुंडे, श्रीनिवास अनंता जाधव, अशिष संजय पवार, (सर्व क्रीडा प्रबोधिनी पुणे), शंभूराजे यादव (धाराशिव)
युथ बॉईज :
संस्कार घोरपडे, अर्णव
गौंड,
अनुज गौंड, अर्णव गुडाळकर (सर्व पुणे)
महिला गट वुमेन ईलीट : पूजा दानोले (कर्णधार - कोल्हापूर),
श्वेता गुंजाळ, अदिती प्रमोद डोंगरे (क्रीडा प्रबोधिनी पुणे) संस्कृती खेसे
( दोघी पुणे), शिया
ललवाणी (नाशिक)
वुमेन ज्युनिअर : सायली आरंडे (कोल्हापूर), सिद्धी शिर्के (पुणे), आकांक्षा म्हेत्रे (जळगाव), आसावरी अनिल राजमाने, ऋतिका भाऊसो शेजुळ (दोघी क्रीडा प्रबोधिनी पुणे),
गर्ल्स सब ज्युनिअर : आभा सोमण (पुणे), प्राजक्ता सूर्यवंशी (सांगली),
प्रेरणा शिवाजी कळके, श्रावणी अमोल कासार (दोघी क्रीडा प्रबोधिनी पुणे),
निकिता शिंदे (कोल्हापूर)
युथ गर्ल्स् : गायत्री तांबवेकर, ज्ञानेश्वरी माने, मुग्धा कर्वे, सृष्टी जगताप (सर्व पुणे)
मुख्य प्रशिक्षक : श्रीमती दिपाली पाटील, महिला प्रशिक्षक / व्यवस्थापिका
: श्रीमती दिपाली शिलढणकर प्रक्षिक
: दर्शन बारगुजे प्रशिक्षक / मेकॅनिक : स्वप्निल माने व्यवस्थापक :
रविंद्र पानकडे
Post a Comment
0 Comments