Type Here to Get Search Results !

एमसीए महिला क्रिकेट लीग फोर्ट यंगस्टर्सच्या विजयात वेदिका मगरची चमकदार कामगिरी

 

वेदिका मगर -  १२ धावांत निम्मा संघ गारद केला

एमसीए महिला क्रिकेट लीग

फोर्ट यंगस्टर्सच्या विजयात वेदिका मगरची चमकदार कामगिरी

 

मुंबई, २२ नोव्हेंबर: एमसीए महिला क्रिकेट लीगमध्ये फोर्ट यंगस्टर्सने दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनवर 29 धावांनी विजय मिळवला. फोर्ट यंगस्टर्सने १०१ धावांचे आव्हान दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनला पेलवले नाही. वेदिका मगर (5/12) आणि जान्हवी काटे (2/23) यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनचा डाव २०.३ षटकांत ७१ धावांवर संपला.

याआधी, फोर्ट यंगस्टर्सने २८.५ षटकांत १०० धावांची मजल मारली, ज्यात शन्मया उपाध्यायच्या (२७ धावा) योगदानाचा समावेश होता. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनकडून कृतिका कृष्णकुमारने (५/२५) चांगली गोलंदाजी केली होती.

अन्य लढतीत, दहिसर एससीने व्हिक्टरी सीसीवर ५ विकेट राखून विजय मिळवला. सौम्या सिंग (४१ धावा) आणि तन्वी गावडे (३१ धावा) यांच्या अचूक बॅटिंगसोबतच, वैष्णवी देसाई (३/३४) यांच्या भेदक गोलंदाजीने दहिसर एससीला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक:

  • व्हिक्टरी सीसी - ३३.१ षटकांत सर्वबाद १६१ (मानसी तिवारी ३४, कृतिका यादव ३४; वैष्णवी देसाई ३/३४) वि. दहिसर एससी - ३३.५ षटकांत ४ बाद १६५ (सौम्या सिंग ४१, तन्वी गावडे ३१). निकाल - दहिसर एससी ५ विकेट राखून विजयी.
  • फोर्ट यंगस्टर्स - २८.५ षटकांत सर्वबाद १०० (शन्मया उपाध्याय २७; कृतिका कृष्णकुमार ५/२५) वि. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन - २०.३ षटकांत सर्वबाद ७१ (वेदिका मगर ५/१२, जान्हवी काटे २/२३). निकाल - फोर्ट यंगस्टर्स २९ धावांनी विजयी.
  • ग्लोरियस सीसी - ४० षटकांत ३ बाद १६९ (साध्वी संजय ७२, श्रद्धा शेट्टी ४६*) वि. राजावाडी सीसी - ३३ षटकांत ४ बाद १७२ (तुशी शहा ५२, वृषाली भगत ३८*; वैष्णवी वर्मा २/३९). निकाल - राजावाडी सीसी ६ विकेट राखून विजयी.

 



Post a Comment

0 Comments