Type Here to Get Search Results !

मलबार हिल क्लब राज्य वरिष्ठ स्नूकर स्पर्धा मानव, युधिष्ठिर, आदित सेमीफायनलमध्ये

 


मलबार हिल क्लब राज्य वरिष्ठ स्नूकर स्पर्धा

मानव, युधिष्ठिर, आदित सेमीफायनलमध्ये


मुंबई, 22 नोव्हेंबर: मुंबईच्या मानव पांचाल, युधिष्ठिर जयसिंग आणि आदित राजाने सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मलबार हिल क्लब राज्य रँकिंग स्नूकर स्पर्धेत वरिष्ठ पुरुषांच्या 15-रेड स्नूकर प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला.

 

एमएचसी बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मानवने गौरव जयसिंघानीला ४-२ (४३-४१, ५३-६७, ६० (३०)-३७, ७३-९१(३४), ६८-१३, ७१-०) असे पराभूत केले. आदितने मुंबईच्याच हसन बदामीला ४-० (६४(५४)-१३, ५९(३२)-२३, ६८-५९(४८), ५८ (३०)-१) असे पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

 

आणखी एका रंगतदार सामन्यात सुमीत आहुजाने मुंबईच्या सुमेर मागोचा ४-३ असा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

 

अन्य चुरशीच्या लढतीत, युधिष्ठिरने ठाण्याच्या कृष्णा तोहगावकरला ४-३ (६०-५०, ५५(४०)-१२, ५४-२७, २२-८६, १८-५८, ४८-६२, ६८-३४) असे हरवले.

 

निकाल – पुरुष १५-रेड स्नूकर (उपांत्यपूर्व फेरी):

  • आदित राजा (मुंबई) विजयी वि. हसन बदामी (मुंबई) ४-० (६४(५४)-१३, ५९(३२)-२३, ६८-५९(४८), ५८(३०)-१)

 

  • मानव पांचाल (मुंबई) विजयी वि. गौरव जयसिंघानी (वाशी) ४-२ (४३-४१, ५३-६७, ६०(३०)-३७, ७३-९१(३४), ६८-१३, ७१-०)

 

  • युधिष्ठिर जयसिंग (मुंबई) विजयी वि. कृष्णा तोहगावकर (ठाणे) ४-३ (६०-५०, ५५(४०)-१२, ५४-२७, २२-८६, १८-५८, ४८-६२, ६८-३४)

Post a Comment

0 Comments