ड्रीम ११ कप १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीला विजेतेपद
मुंबई, २८
नोव्हेंबर: ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने चुरशीच्या अंतिम सामन्यात किंग्जले
स्पोर्ट्स क्लबवर ४ धावांनी रोमांचक विजय मिळवत १२ वर्षाखालील ड्रीम ११ कप क्रिकेट
स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पारितोषिक वितरण समारंभात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी विजेत्या
संघाचे अभिनंदन केले. त्यांनी तरुण खेळाडूंना चांगल्या सवयी आणि शिस्त
अंगीकारण्याचा सल्ला दिला. "खेळाडूंनी स्वतःच्या खेळात सातत्याने प्रगतीसाठी प्रयत्न
करावेत,"
असे ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज
मिलिंद कुलकर्णी, ड्रीम ११चे प्रशासकीय अधिकारी नवीन फर्नांडिस आणि प्रशांत तायडे,
तसेच ऍडव्होकेट दीपक ठाकरे उपस्थित होते.
अंतिम सामन्याचा थरार
ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना ३० षटकांत ७ बाद १९२
धावा केल्या.
- निखिल
अहिरवाल (५९) आणि विहान अस्वले (३८) यांच्या जोरदार सलामीनंतर
- स्तवन मोरे
(नाबाद ५४) आणि
आकाश त्रिपाठी
(१९) यांनी महत्त्वपूर्ण
योगदान दिले.
किंग्जले स्पोर्ट्स क्लबकडून अद्विक देसाई याने २५ धावांत २ बळी घेतले.
धावांचा पाठलाग करताना किंग्जले स्पोर्ट्स क्लबकडून
- दर्श मातले
(२६) आणि
शार्दूल फटनाईक
(३८) यांनी ५६ धावांची सलामी
दिली.
- त्यानंतर रीदीत पुजारी (६५) याने फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, अखेरच्या षटकात श्लोक गवळी (नाबाद ३३) याचा झुंजार प्रयत्न अपुरा ठरला, आणि संघाला ३ बाद १८८ धावांवरच थांबावे लागले.
संक्षिप्त धावफलक:
ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी
– ३० षटकांत ७ बाद १९२
(विहान अस्वले ३८, निखिल अहिरवाल ५९, स्तवन मोरे नाबाद ५४; अद्विक देसाई २५ धावांत २ बळी)
किंग्जले स्पोर्ट्स क्लब
– ३० षटकांत ३ बाद १८८
(दर्श मातले २६, शार्दूल फटनाईक ३८, रीदीत पुजारी ६५, श्लोक गवळी नाबाद ३३)
फोटो ओळ:
ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट
अकादमी संघाचा फोटो. सोबत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर,
महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज मिलिंद कुलकर्णी,
ड्रीम ११चे प्रशासकीय अधिकारी नवीन फर्नांडिस आणि प्रशांत
तायडे,
ऍडव्होकेट दीपक ठाकरे, आणि अकादमीचे प्रशिक्षक.
Post a Comment
0 Comments