महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024
शाबाज व राझमीमध्ये फायनलमध्ये भिडणार
मुंबई, 6 डिसेंबर: शाबाज खानने अतुलनीय कौशल्य आणि निर्धाराच्या
जोरावर सुमेर मगोचे कडवे आव्हान 4-3 (85-32, 64-32, 25-68, 42-74,
70-62, 57-60, 78-41) असे मोडीत काढले
आणि महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत
त्याच्यासमोर रायन राझमीचा कस लागणार आहे.
मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या गेलेल्या या
स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात, रायन राझमीने तगड्या अनुभवी क्यूईस्ट आदित्य मेहतावर 4-2
(15-68, 76-28, 66-13, 70-53, 48-73, 71-33) असा विजय मिळवून अंतिम सामन्याचे तिकीट निश्चित केले.
शाबाजने पहिल्या फ्रेममध्ये 83 चा शानदार ब्रेक साधत सामन्याला प्रभावी सुरुवात केली आणि
पुढील फ्रेमही सहज जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली. मात्र, सुमेर मगोने निर्धाराने खेळ करत पुढच्या दोन फ्रेम्स जिंकून
सामन्यात बरोबरी साधली. नंतरच्या दोन फ्रेम्सही चुरशीच्या झाल्या,
ज्या दोघांनी वाटून घेतल्या. निर्णायक सातव्या फ्रेममध्ये
शाबाजने संयम राखत महत्त्वाच्या ब्रेक्स साधले आणि सामन्यात विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात, राझमीने सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण खेळ करत गुणांची कमाई
केली. आदित्य मेहताने पहिली फ्रेम जिंकत आघाडी घेतली,
पण राझमीने सलग तीन फ्रेम्स जिंकून 3-1
अशी मजबूत आघाडी घेतली. मेहताने पाचव्या फ्रेममध्ये 73
चा शानदार ब्रेक साधत विजय मिळवला,
पण राझमीने सहाव्या फ्रेममध्ये पुनरागमन करत सामना जिंकला.
निकाल:
स्नूकर 15-रेड – उपांत्य फेरी:
शाबाज खान विजयी वि. सुमेर मगो 4-3
(85(83)-32, 64-32, 25-68, 42-74, 70-62, 57-60, 78-41)
रायन राझमी विजयी वि. आदित्य मेहता 4-2
(15-68, 76-28, 66-13, 70-53, 48-73(73), 71-33)
फोटो ओळ: शाबाज खानने उपांत्य फेरीत राज्यातील आठव्या क्रमांकाच्या
सुमेर मगोवर 4-3 असा
चुरशीचा विजय मिळवला.
Post a Comment
0 Comments