Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धा 2024 सीनियर बिलियर्ड्स जेतेपदासाठी सितवाला, राझमी आमनेसामने

 


महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धा 2024

सीनियर बिलियर्ड्स जेतेपदासाठी सितवाला, राझमी आमनेसामने

मुंबई, 9 डिसेंबर: मलबार हिल क्लब महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धेत सीनियर पुरुष बिलियर्ड्स प्रकाराच्या जेतेपदासाठी जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियन ध्रुव सितवाला आणि रायन राझमी यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

 

मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉल येथे रविवारी संध्याकाळी उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात राष्ट्रीय बिलियर्ड्स विजेता डावखुरा ध्रुव सितवाला याने विशाल मदनचा 4-1 (149-150, 151-28, 151-26, 151-16, 150-127) असा पराभव केला. पहिल्या फ्रेममध्ये पराभूत झाल्यानंतर सितवालाने सलग दोन शतकी ब्रेक (110 आणि 104) खेळत आपले वर्चस्व सिद्ध केले.

 

दुसऱ्या उपांत्य फेरीत, यापूर्वी वरिष्ठ स्नूकर प्रकारात विजेतेपद पटकावलेल्या रायन राझमीने अत्यंत चुरशीच्या लढतीत अनुभवी सिद्धार्थ पारीखवर 4-3 (152(147)-45, 23-150(74), 20-152(152), 150(59,46)-71, 151(119)-46, 6-150(113), 150(56)-73) असा रोमांचक विजय मिळवला.

 

राझमीने पहिल्या फ्रेममध्ये 147 चा शानदार ब्रेक केला, तर पाचव्या फ्रेममध्ये 119 गुणांची कामगिरी केली. पारीखनेही शानदार खेळ करत तिसऱ्या फ्रेममध्ये 152 चा अपूर्ण ब्रेक व सहाव्या फ्रेममध्ये 113 गुणांचे प्रयत्न केले. मात्र, निर्णायक सातव्या फ्रेममध्ये रायनने संयमाने खेळ करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

निकाल - वरिष्ठ बिलियर्ड्स (उपांत्य फेरी):

ध्रुव सितवाला विजयी वि. विशाल मदन 4-1 (149-150(68,61), 151(110)-28, 151(90)-26, 151(104)-16, 150-127).

रायन राझमी विजयी वि. सिद्धार्थ पारीख 4-3 (152(147)-45, 23-150(74), 20-152(152), 150(59,46)-71, 151(119)-46, 6-150(113), 150(56)-73).

 

फोटो: सितवाला: ध्रुव सितवालाने उपांत्य फेरीत विशाल मदनचा 4-1 असा पराभव केला.

 

पारीख: रायन राझमीने सिद्धार्थ पारीखला 4-3 अशा थरारक सामन्यात पराभूत केले.


 


Post a Comment

0 Comments