5वी अर्जुन मढवी स्मृती महिला चषक स्पर्धा
रीगल क्रिकेट क्लबचा 6 विकेट्सनी शानदार विजय
रिगल क्रिकेट
क्लबने स्पोर्टिंग युनियन क्लबचा सहा गडी राखून पराभव करत डॉ. राजेश मढवी
स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती ४०
षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
स्पोर्टिंग
युनियन क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ३९
षटकांत ७ बाद १५३ धावा केल्या. मानसी चव्हाणने २४ आणि दीपाली शेलारने नाबाद १४
धावा केल्या. रिगल क्रिकेट क्लबच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु त्यांनी सुमारे ६० अतिरिक्त धावा दिल्या आणि कमी षटकांची गती
राखल्यामुळे १३ धावांचा दंड पत्करावा लागला. चेतना बिष्ट, वैष्णवी अय्यंगार, कोमल जाधव, गौरी कदम, आणि प्रियदर्शनी सिंग
यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
१५३ धावांचे
लक्ष्य रिगल क्रिकेट क्लबने २६.४ षटकांत चार गडी गमावत पूर्ण केले. रिगलच्या
फलंदाजांनी छोट्या पण प्रभावी खेळीद्वारे विजयावर शिक्कामोर्तब केले. चेतना
बिष्टने ३६, जेटसून चीने नाबाद ३५, आकांक्षा मिश्राने ३२, आणि हर्षल जाधवने २७
धावांचे योगदान दिले. स्पोर्टिंग युनियन क्लबकडून मानसी चव्हाणने २ बळी घेतले, तर निधी सावंत आणि पहल पोपट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक:
स्पोर्टिंग युनियन क्लब: ३९ षटकांत ७ बाद १५३
मानसी चव्हाण
२४, दीपाली शेलार नाबाद १४; चेतना बिष्ट
८-३-९-१, वैष्णवी अय्यंगार ३-२१-१, कोमल जाधव
८-३५-१, गौरी कदम ५-११-१, प्रियदर्शनी
सिंग ५-१-१०-१
रिगल क्रिकेट क्लब: २६.४ षटकांत ४ बाद १५४
चेतना बिष्ट ३६, जेटसून ची नाबाद ३५, आकांक्षा मिश्रा ३२, हर्षल जाधव २७; मानसी चव्हाण ८-२-३०-२, निधी सावंत ४-२२-१, पहल पोपट ०.४-३-१
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू: चेतना बिष्ट.
Post a Comment
0 Comments