मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
बालयोगी सदानंद आणि आकाश स्पोर्ट्सची उपांत्यपूर्व फेरीत
धडक
मुंबई: मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या जिल्हा अजिंक्यपद
निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत बालयोगी सदानंद अकादमी आणि आकाश स्पोर्ट्सने कुमारी
गटात आपली चमक दाखवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव
क्रीडांगणावर चारकोप संयोजन अँडव्हटायजिंग आणि मार्केटिंग प्राईव्हेट ली.च्या संचालिका नम्रता
भोसले यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.
कुमारी गट:
बालयोगी सदानंद अकादमीने ओम् नवमहाराष्ट्रचा ४१-०६ असा धुव्वा उडवीत सहज
विजय मिळवला. मध्यांतराला २३-०३ अशी आघाडी घेतलेल्या संघाने सामना एकतर्फी केला.
भार्गवी आणि शुभश्री म्हात्रे या भगिनींच्या अप्रतिम कामगिरीमुळे संघाला यश
मिळाले.
आकाश स्पोर्ट्सने अंजनी मंडळावर ३०-१७ असा विजय मिळवला. पियुष्का
शिंदे आणि धनश्री कोकरे यांच्या उत्तम चढाई-पकडीमुळे संघाने आपले वर्चस्व सिद्ध
केले. अंजनीच्या प्राप्ती म्हात्रेने उत्तरार्धात दमदार खेळ केला, परंतु संघाचा पराभव टाळता आला नाही.
कुमार गट:
सागर मंडळाने चुरशीच्या सामन्यात राजा छत्रपती संघाचा २६-२३
असा पराभव केला. पहिल्या डावात पार्थ सादरे आणि सिद्धांत मोरे यांच्या खेळामुळे
सागरने आघाडी घेतली, परंतु दुसऱ्या डावात गौतम राय आणि ब्रिजमोहन राय यांनी छत्रपती संघासाठी
चांगली झुंज दिली.
नव जीवन मंडळाने ओम् भारत संघावर २८-१८ असा विजय मिळवला. सुजल
माईन आणि वेदांत भाताडे यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संघ विजयी ठरला, तर ओम् भारतकडून आकाश बनेने चमकदार खेळ
केला.
छत्रपती मंडळाने बालवीर स्पोर्ट्सवर ४१-०७ असा मोठा विजय
मिळवला. आर्यन कुडतरकर आणि ज्योतिबा पाटील यांच्या प्रभावी कामगिरीमुळे बालवीर
संघाला प्रतिसाद देता आला नाही.
महिला गट:
शिवशक्ती वॉरियरने चेंबूर क्रीडा केंद्राचा ४१-०७ असा पराभव केला.
तेजस्विनी स्पोर्ट्सने माऊली प्रतिष्ठानवर १९-१३ अशी मात केली आणि
दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
Post a Comment
0 Comments