सरस्वती मंदिर
हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय खो-खो स्पर्धा
सरस्वती मंदिरला दुहेरी मुकुट
माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलतर्फे आयोजित अमृत
महोत्सवी आंतरशालेय खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू असून, आज झालेल्या अंतिम सामन्यात चुरशीच्या खेळाचे
प्रदर्शन झाले. या दोन्ही सामन्यात यजमान सरस्वती मंदिर हायस्कूल विजय साजरे केले.
मुलींचा अंतिम सामना:
मुलींच्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने बंगाली एज्युकेशन सोसायटीला
८-६ असा दोन गुणाने पराभव करत विजय मिळवला. या सामन्यात सरस्वती मंदिर कडून
खेळताना अवनी पाटीलने (१:५० व १:३० मि संरक्षण) स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षण
बक्षीस मिळवले. हर्षला सकपाळने (२:२० मि. ४:०० मि. संरक्षण व आक्रमणात ०३ गुण) उत्कृष्ट खेळ करत स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू
ठरली. तर पराभूत बंगाली एज्युकेशन सोसायटी कडून खेळताना सिद्धी शिंदेने (आक्रमणात
२ गुण) उत्कृष्ट खेळ करताने स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरली.
मुलांचा अंतिम सामना:
मुलांच्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूलने डी. बी. कुलकर्णी हायस्कूलवर १७-११ असा ६ गुणांनी
विजय मिळवला. या सामन्यात सरस्वती मंदिर कडून खेळताना रुद्रसिंग चव्हाणने (२:५० व
२:३० मि. संरक्षण) जबरदस्त खेळ करत स्पर्धेतील उत्कृष्ट संरक्षण बक्षीस मिळवले. शिवम
झाने (१ मि., १ मि. संरक्षण करून व आक्रमणात ०२ गुण) सुध्दा जोरदार खेळ करत स्पर्धेतील
अष्टपैलू खेळाडू ठरला. तर परभूत डी. बी. कुलकर्णी हायस्कूल कडून खेळताना प्रज्वल
सोनावणेने (आक्रमणात २ गुण) सुध्दा चांगला खेळ करत स्पर्धेतील उत्कृष्ट आक्रमक
खेळाडू ठरला.
स्पर्धेतील
खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली, तर सरस्वती मंदिर हायस्कूलने आपल्या खेळाची
गुणवत्तादेखील सिद्ध केली.
Post a Comment
0 Comments