६६वी अशोक रुईया स्मृती राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा
महिला जोडी स्पर्धेत झवेरी, करमरकर विजेते
मुंबई, १०
डिसेंबर: ६६व्या अशोक रुईया स्मृती राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेच्या अमला रुईया
महिला जोडी स्पर्धेत अदिती झवेरी आणि मरियान करमरकर यांनी विजेतेपद मिळवले.
छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे सुरू असलेल्या या
स्पर्धेत १८ जोड्यांदरम्यान ५१ बोर्डांच्या ऑल-प्ले फॉरमॅटमध्ये अंतिम साखळी फेरी
झाली. या फेरीत झवेरी-करमरकर जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत ७३ आयएमपीज मिळवत जेतेपद
पटकावले.
वासंती शाह (मुंबई) आणि गोपिका टंडन (दिल्ली) जोडीने ६४
आयएमपीजसह दुसरे स्थान मिळवले, तर
अलका एम. क्षीरसागर आणि भारती डे जोडीने ४३ आयएमपीजसह तिसऱ्या स्थानावर आपली जागा
निश्चित केली.
पहिल्या दिवशी आघाडीवर असलेल्या आशा शर्मा आणि पूजा बत्रा
या दिल्लीच्या जोडीला अंतिम फेरीत अपेक्षित कामगिरी करता न आल्याने २८ आयएमपीजसह
सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
फोटो : अदिती
झवेरी आणि मरियान करमरकर विजेतेपदाच्या ट्रॉफीसह आनंद व्यक्त करताना.
Post a Comment
0 Comments