Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धा 2024 सितवालाला हरवून राझमीने जिंकली सीनियर बिलियर्ड्स स्पर्धा

 


महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धा 2024

सितवालाला हरवून राझमीने जिंकली सीनियर बिलियर्ड्स स्पर्धा

मुंबई : जागतिक बिलियर्ड्स विजेता ध्रुव सितवालावर 4-2 असा विजय मिळवत रायन राझमीने मलबार हिल क्लब महाराष्ट्र राज्य बिलियर्ड्स आणि स्नूकर स्पर्धेत सीनियर पुरुष बिलियर्ड्स जेतेपद पटकावले. सीनियर स्नूकर प्रकारात आधीच बाजी मारलेल्या रायनने या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळवले.

 

मलबार हिल क्लब बिलियर्ड्स हॉल येथे सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात रायनने सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करताना 150(66)-73(55), 61-151(81), 151(97)-147(139), 73-151(74, 58), 152-134, 152(56,53)-67 अशा फ्रेम फरकाने विजय मिळवला. सितवालाने तिसऱ्या फ्रेममध्ये 139 चा अप्रतिम ब्रेक करत रायनला कडवी टक्कर दिली. मात्र, रायनने संयम राखत प्रतिस्पर्ध्यावर नियंत्रण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

रायनने या स्पर्धेत दोन्ही मुख्य स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विजेत्या रायन राझमीला जेतेपदाच्या चषकासोबत रोख 40,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले, तर उपविजेता सितवालाला चषकासह 20,000 रुपये मिळाले. उपांत्य फेरीतील पराभूत खेळाडू सिद्धार्थ पारीख आणि विशाल मदान यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

 

निकाल - सीनियर बिलियर्ड्स (अंतिम फेरी):

रायन राझमी विजयी वि. ध्रुव सितवाला 4-2 (150(66)-73(55), 61-151(81), 151(97)-147(139), 73-151(74, 58), 152-134, 152(56,53)-67).

 

फोटो: रायन राझमीने सीनियर बिलियर्ड्सच्या फायनलमध्ये ध्रुव सितवालाचा 4-2 असा पराभव केला. याआधी त्याने सीनियर स्नूकरचे जेतेपद जिंकले आहे.


 


Post a Comment

0 Comments