आंबेकर स्मृती १९ वर्षाखालील कॅरम स्पर्धा
कौस्तुभ जागुष्टे विजेता
मुंबई: राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ,
आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कामगार
महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती १९ वर्षाखालील कॅरम स्पर्धेत रुईया कॉलेजच्या
कौस्तुभ जागुष्टेने विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात कौस्तुभ जागुष्टे आणि विवा कॉलेज-विरारच्या
जोनाथन बोनाल यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची ठरली. दोन्ही खेळाडूंनी राणीवर
वर्चस्व राखत कौशल्यपूर्ण फटके खेळले. सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या कौस्तुभने
अखेर ५-४ असा विजय मिळवून अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.
उपांत्य फेरी निकाल:
कौस्तुभ जागुष्टेने भव्या सोळंकीचा ७-४ असा पराभव केला.
जोनाथन बोनालने सिद्धार्थ कॉलेजच्या सानिका जाधवचा एकतर्फी
२४-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
इतर निकाल:
अंतिम उपविजेता: जोनाथन बोनाल
उपांत्य उपविजेते: भव्या सोळंकी आणि सानिका जाधव
उपांत्यपूर्व उपविजेते: प्रेक्षा जैन, शेख अहमद मुस्तफा, केवल
कुलकर्णी, आणि गिरीश पवार
स्पर्धेत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, आणि पालघर
जिल्ह्यातील ३६ राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर कॅरमपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धा परळ
येथील आरएमएमएस सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेचे प्रमुख पंच क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक आणि
चंद्रकांत करंगुटकर यांनी स्पर्धेचे यशस्वी संचालन केले. विजेत्या आणि
उपविजेत्यांचा सत्कार संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, आणि सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
Post a Comment
0 Comments