मुंबई विद्यापीठ आंतर कॉलेज कुस्ती स्पर्धा
कुस्तीपटू विशाल, प्रिन्सचे यश
मुंबई: कल्याण येथील सेठ हिराचंद मुथा कॉलेजमध्ये आयोजित मुंबई
विद्यापीठ आंतर कॉलेज कुस्ती स्पर्धेत भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील दोन
कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. विशाल जाधवने ९२ किलो वजनी गटात रौप्य पदक,
तर प्रिन्स यादवने ७१ किलो वजनी गटात कास्य पदकाची कमाई
केली.
या दोघा कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील यांचे कुशल
मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रशिक्षकांच्या योग्य
मार्गदर्शनामुळे हा शानदार यश मिळवता आला.
विशाल आणि प्रिन्सच्या या यशामुळे त्यांच्या आखाड्यात आणि
समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Post a Comment
0 Comments