Type Here to Get Search Results !

६६वी अशोक रुईया स्मृती राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा पहिल्या दिवशी शर्मा, बत्रा जोडीचे वर्चस्व

 


६६वी अशोक रुईया स्मृती राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा

पहिल्या दिवशी शर्मा, बत्रा जोडीचे वर्चस्व


मुंबई, ९ डिसेंबर: छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे सुरू असलेल्या 66व्या अशोक रुईया स्मृती राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत अमला रुईया महिलांच्या जोडी (पेअर) प्रकारात दिल्लीच्या आशा शर्मा आणि पूजा बत्रा या जोडीने पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.

 

मुंबईत नुकत्याच झालेल्या प्राइम सिक्युरिटीज ब्रिज स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या शर्मा आणि बत्रा यांनी आपला दमदार फॉर्म या स्पर्धेतही कायम राखला. त्यांनी 107.29 आयएम गुणांसह पात्रता फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.

 

अनुभवी वासंती शाह (मुंबई) आणि गोपिका टंडन (दिल्ली) यांनी 95.83 आयएम गुणांसह दुसरे, तर अलका एम. क्षीरसागर (पुणे) आणि भारती डे (कोलकाता) यांनी 90.63 आयएम गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

 

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ब्रिज खेळाला भारतात प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या अशोक रुईया यांच्या पत्नी अमला रुईया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर आणि सहभागी खेळाडू उपस्थित होते. अमला रुईया यांनीही जोडीदार मीनल ठाकूरसह स्पर्धेत सहभाग घेतला व अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या.

 

स्पर्धेत एकूण ४० महिला जोड्या सहभागी झाल्या, ज्यांनी प्रत्येकी १० बोर्डच्या ५ फेऱ्यांमध्ये खेळ केला. त्यामधील अव्वल १८ जोड्या ऑल-प्ले-ऑल राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये पुढील फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत.

 

महिला जोडी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर मिश्र जोडी, वरिष्ठ संघ, सुवर्ण आणि रौप्य खुला संघ, तसेच मॅच पॉइंट्स जोडी या प्रकारांच्या स्पर्धाही होणार आहेत.

 

निकाल - पात्रता फेरी (टॉप-10): आशा शर्मा/पूजा बत्रा: 107.29, वासंती शाह/गोपिका टंडन: 95.83, अलका एम. क्षीरसागर/भारती डे: 90.63, एकता चढ्ढा/बीना मल्होत्रा: 80.21, शीतल बन्सल/सारिका मित्तल: 80.00, अदिती झवेरी/मरियान करमरकर: 51.04, कल्पना गुर्जर/विद्या पटेल: 49.00, हेमा दाते/सुषमा करंदीकर: 47.92, मोनिका जाजू/जेसल डब्रिवाला: 39.58, मालती जैन/निकिता कमल: 38.54

 

फोटो कॅप्शन:

भारतात ब्रिज खेळाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या अशोक रुईया यांच्या पत्नी अमला रुईया यांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी अनेक मान्यवर आणि सहभागी खेळाडू उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments