'मुंबई स्पोर्ट्स २ रे 'स्पोर्ट्सपर्सन ऑफ द
इयर' आणि 'मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार प्रदान
ध्रुव सितवालाने मिळालेली एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम भारतीय
सैन्याच्या विधवांसाठीच्या निधीसाठी देणगी म्हणून जाहीर केली
राजकीय पक्षंनी खेळाचा
व त्याच्या विकासाचा मुद्दा निवडणूक जाहीरनाम्यात घ्यावा व त्याची अंमलबजावणी
करावी - मुंबई स्पोर्ट्स
स्पोर्ट्स कोड
तारकच - राजू भावसार
मुंबई, मुंबई
स्पोर्ट्स नुकतेच “स्पोर्ट्सपर्सन
ऑफ द इयर” व “मुंबई स्पोर्ट्स ऑर्डर ऑफ मेरिट” चे पारितोषिक वितरण केले. हे
पुरस्कार प्रवीण शेट्टी – अध्यक्ष, बंट्स संघ, आर. के. शेट्टी प्र. कार्यवाह बंट्स
संघ, प्रदीप गंधे, रविराज ईळवे (कामगार आयुक्त), जय कवळी, उदय देशपांडे, जया
शेट्टी, भास्कर सावंत आदी खेळातील दिग्गजांकडून वितरीत करण्यात आले. बक्षीस
वितरणानंतर खेळाडूंनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या त्या पुढील प्रमाणे.
ध्रुव सितवाला : त्यांना
मुंबई स्पोर्ट्सकडून "स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24" पुरस्कार प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी जाहीर केले की
या पुरस्काराची रक्कम रु. 1,00,000/- (रु. एक लाख) मुंबई
स्पोर्ट्सतर्फे भारतीय सैन्याच्या विधवांसाठीच्या निधीसाठी देणगी म्हणून दिली
जावी. त्यांच्या या कृतीने ते फक्त त्यांच्या खेळाचेच चॅम्पियन नाहीत, तर हृदयानेही चॅम्पियन आहेत हे दाखवून दिले.
अश्वार्या
मिश्रा : यांनी आपला संदेश वडील आणि भाऊ यांच्या माध्यमातून
पाठवला, त्यांनी तिच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. त्यांनी भारतातील अॅथलेटिक
खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आदिले सुमारिवाला यांचे आभार मानले.
तसेच "मुंबई स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2023-24" पुरस्कारासाठी
मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला.
अक्षन के.
शेट्टी : यांचा पुरस्कार त्यांचे वडील श्री करुणाकर शेट्टी यांनी
स्वीकारला, जे पोइसर जिमखान्याच्या यशस्वीतेमागील मुख्य व्यक्तिमत्त्व
आहेत. अक्षन यांनी मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त
केली. हा पुरस्कार म्हणजे घरच्यांनी आपल्या व्यक्तीला दिलेला सन्मान असल्याचे
सांगितले.
कुणाल कोठेकर : यांनी मुंबई
स्पोर्ट्सने खेळाडूंना सन्मानित करण्याचा हा उत्कृष्ट उपक्रम असल्याचे सांगितले व
सर्वांचे आभार मानले.
रुतुजा खाडे : यांनी मुंबई
स्पोर्ट्सकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की
मुंबईच्या खेळाडूसाठी हा पुरस्कार मिळणे हे अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. आमच्या
कामगिरीची दखल मुंबईतील संपूर्ण खेळ जगात घेत आहे याचा अभिमान असल्याचे स्पष्ट
केले.
सोनाली बोराडे : यांनी
पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
तसेच यामुळे तिचा हुरूप वाढल्याचे सांगितले आणि मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले.
नताशा जोशी : पॅरा डेफ
ऑलिम्पिक शूटर, यांनी सांगितले की मुंबई स्पोर्ट्स दरवर्षी खेळाडूंना
पुरस्कार देऊन उत्तम कार्य करत आहे. मुंबई स्पोर्ट्सकडून मिळालेला सन्मान तिच्या
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरेल आणि भविष्यातील मुंबईतील खेळाडूंना प्रेरणा देईल.
मिलिंद वागळे : क्रिकेट
समालोचक, यांनी मुंबई स्पोर्ट्सचे मनःपूर्वक आभार मानले आणि पद्मश्री उदय देशपांडे,
त्यांच्या बालपणीच्या मित्राच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून आनंद
व्यक्त केला.
भाग्यश्री सावंत : यांच्या आईने
पुरस्कार स्वीकारला व अशा प्रकारे पहिल्यांदाच सन्मान झाल्याचे सांगितले.
प्रदीप गांधे : "श्री मेजर ध्यानचंद
लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड" विजेते, यांनी सांगितले की
मुंबई स्पोर्ट्सने मुंबईतील खेळाडूंना त्यांच्या यशासाठी सन्मानित करण्याची अनोखी
प्रथा सुरू केली आहे. त्यांनी मुंबई स्पोर्ट्सचे आभार मानले आणि खेळासाठी मुंबईत
आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सर्व खेळाडूंनी एकत्र यावे,
असे आवाहन केले.
जय कवळी : राजकीय पक्ष
मुंबईतील खेळांसाठी काय उपाय योजना करणार आहेत? खेळासाठी "स्पोर्ट्स लॉबी" तयार करणे
ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले व
त्या "स्पोर्ट्स लॉबी"ने राजकीय पक्षांकडे पाठपुरावा केला पाहिजे.
त्याचप्रमाणे राजकीय पक्षंनी मुंबईतील खेळांचा व त्याच्या विकासाचा मुद्दा निवडणूक
जाहीरनाम्यात जाहीर केला पाहिजे व त्याची अंमलबजावणी सुध्दा केली पाहिजे असे
आवर्जून सांगितले.
स्पोर्ट्स कोड तारक कि मारक : स्पोर्ट्स
कोडवर राजू भावसार, क्रीडा पत्रकार महेश विचारे व अॅड. नंदन कामत यांनी आपले परखड
विचार मांडले व त्यातून राजू भावसार यांनी स्पोर्ट्स कोड तारकच असल्याचे
सांगितले.
या पुरस्कार
वितरण सोहळ्याला बंट्स संघाने त्यांचे
सभागृह व भोजन व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली होती. या समारंभाचे सूत्रसंचालन
क्षितीज वेदक यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळ तोरसकर यांनी केले.
Post a Comment
0 Comments