तुकाराम सुर्वे स्मृती क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
संपन्न
ठाणे: ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू
तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित १६ वर्षे वयोगटातील चार संघांच्या
पहिल्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी रविवारी सेंट्रल
मैदानावर यशस्वीरीत्या पार पडली. ही स्पर्धा १७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान
सेंट्रल मैदान आणि दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे, अशी
माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक अतुल सुर्वे यांनी दिली.
स्मृतीला अभिवादन:
अतुल सुर्वे म्हणाले की,
"बाबा" या टोपणनावाने प्रसिद्ध
असलेले तुकाराम सुर्वे यांनी स्थानिक क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी
मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या स्पर्धेत
स्थानिक युवा क्रिकेटपटूंना वरच्या पातळीवर खेळण्याची संधी मिळावी, हा
मुख्य उद्देश आहे.
संघ व प्रशिक्षक:
स्पर्धेकरता तुकाराम सुर्वे यांचे समकालीन अनंत धामणे, गोविंद
पाटील, सदाभाऊ
सातघरे, आणि
गणाभाऊ भुवड यांच्या नावाने चार संघ नेमण्यात आले आहेत. या संघांचे प्रशिक्षक
अनुक्रमे परेश नाखवा, किरण साळगावकर, दर्शन भोईर, आणि संग्राम शिर्के असतील.
निवड चाचणीची वैशिष्ट्ये:
या निवड चाचणीत १६ वर्षांखालील जिल्ह्यातील तब्बल ४०० युवा
क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला. खेळाडूंची निवड मुंबई क्रिकेट संघटनेच्या तज्ज्ञ निवड
समिती सदस्य प्रशांत सावंत, जयप्रकाश जाधव, तसेच माजी रणजीपटू रवी ठक्कर आणि राजू शिर्के यांनी केली.
स्पर्धा स्वरूप:
साखळी पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत
गुणक्रमानुसार अव्वल दोन संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रम:
स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अंजिक्य
नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप, सहसचिव
दिपक पाटील, कौशिक गोडबोले, आणि विघ्नेश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Post a Comment
0 Comments