युग पाटील ठरला ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स स्पर्धेचा स्प्रिंट
किंग!
12
वर्षांखालील वयोगटातील
सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला
मुंबई: एआयएम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युग पाटीलने युनिव्हर्सिटी पॅव्हेलियन
मैदानावर पार पडलेल्या ट्रॅकनाईट ॲथलेटिक्स
स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत तीन सुवर्णपदक जिंकली. आपल्या वेगवान खेळाने
त्याने 12 वर्षांखालील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला आणि स्पर्धेतील स्प्रिंट किंग म्हणून आपली मोहोर उमटवली.
स्पर्धेतील ठळक कामगिरी : 60 मीटर स्पर्धेत युगचे
वर्चस्व
60 मीटर शर्यतीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. युग पाटीलने 8.465 सेकंदात रेस
पूर्ण करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. त्याला डीएसएसएच्या दैविक नायडूने (8.620 सेकंद) कडवे आव्हान दिले आणि रौप्यपदक पटकावले. चिल्ड्रन्स ॲकॅडमी ग्रुप ऑफ स्कूलच्या जेसन जिमीने (9.015 सेकंद) कांस्यपदक मिळवले.
120 मीटरमध्ये सातत्यपूर्ण वेगाचा प्रभाव
युगने 120 मीटर धावणे प्रकारातही वर्चस्व गाजवत 15.862 सेकंदात अंतिम
रेषा पार केली आणि आपले दुसरे सुवर्ण जिंकले. दैविक नायडूने (16.973 सेकंद) पुन्हा एकदा दमदार खेळ करत रौप्य पटकावले, तर जीएईटीमधील आरव कुलकर्णीने (17.740 सेकंद) कांस्यपदक जिंकले.
300 मीटरमध्ये सुवर्ण हॅट्ट्रिक आणि निर्विवाद स्प्रिंट किंगचा किताब
युग पाटीलने 300 मीटर शर्यतीत जबरदस्त वेग दाखवत 42.779 सेकंदात
सुवर्णपदक मिळवले आणि स्पर्धेतील तिसरे
सुवर्ण पटकावत आपली दबदबा कायम ठेवला. यश पालवीने (47.006 सेकंद) रौप्यपदक जिंकले, तर जीएईटीमधील श्री कांबळीने (47.027 सेकंद) कांस्यपदक मिळवले.

Post a Comment
0 Comments