प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत समर चव्हाण विजेता
मुंबई: प्रेस एनक्लेव्हतर्फे आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत समर
चव्हाण याने विजेतेपद पटकावले. सायन प्रतिक्षानगर येथे पार पडलेल्या या
स्पर्धेत समरने पाच फेऱ्यांमध्ये चार विजय व एक सामना अनिर्णित राखत ४.५
गुणांची कमाई केली. मात्र, अमोघ शर्मानेही तितक्याच गुणांसह स्पर्धेत अजेय राहिल्याने टायब्रेक नियमांचा आधार घेण्यात आला. टायब्रेक गुणगतीत समरने १३.२५
विरुद्ध १२.७५ अशा अवघ्या ०.५० गुणांच्या फरकाने बाजी मारली, तर अमोघला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अदिश गावडे ४
गुणांसह तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
विजेत्यांचे पारितोषिक:
🏆 समर चव्हाण – कै.
सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ ₹२५००, चषक आणि प्रमाणपत्र.
🥈 अमोघ शर्मा – कै.
नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ ₹१५००, चषक आणि प्रमाणपत्र.
🥉 अदिश गावडे – कै.
सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ ₹१०००, चषक आणि प्रमाणपत्र.
लक्षवेधी खेळाडूचा सन्मान:
स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू म्हणून युवान तावडे याला
विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
पारितोषिक वितरण समारंभ:
यावेळी ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे यांच्या
हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धा संयोजक शरद पाठक
आणि गणेश गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो:
प्रेस एनक्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेतील विजेते खेळाडू
(डावीकडून): युवान तावडे, विजेता समर चव्हाण, प्रमुख
पाहुणे राजन पिंगळे, उपविजेता अमोघ शर्मा आणि तृतीय क्रमांक
विजेता अदिश गावडे.

Post a Comment
0 Comments