Type Here to Get Search Results !

आंतर को-ऑप. बँक बुद्धिबळ स्पर्धेत मानस सावंतला विजेतेपद

 


आंतर को-ऑप. बँक बुद्धिबळ स्पर्धेत मानस सावंतला विजेतेपद

 

मुंबई: को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबईतर्फे विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक बुद्धिबळ स्पर्धेत म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंतने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत एमएससी बँकेच्या आदित्य जोशीविरुद्ध सावंतने आक्रमक खेळ करत हत्ती व वजिराच्या प्रभावी चालींनी नवव्या मिनिटात विजय मिळवला आणि अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

 

तृतीय स्थानासाठी संघर्ष:

🥉 तृतीय क्रमांकाच्या लढतीत एनकेजीएसबी बँकेच्या विनोद मोरेने मुंबई बँकेच्या सचिन काटकरला २८व्या मिनिटाला पराभूत करत ब्राँझपदक पटकावले.

 

उपांत्यपूर्व विजेते:

  • रियाल जावकर (एनकेजीएसबी बँक), उमेश भोईर (डेक्कन मर्कंटाईल बँक) संजय साटम (म्युनिसिपल बँक), सोमनाथ स्वामी (एमएससी बँक),

 

स्पर्धेचे आयोजन:

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ४० बुद्धिबळपटूंच्या सहभागाने दादर-पश्चिम येथील सीबीईयु सभागृहात ही स्पर्धा पार पडली.

 

पारितोषिक वितरण समारंभ:

विजेत्यांना युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, खजिनदार प्रमोद पार्टे, सहखजिनदार जनार्दन मोरे तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संयोजन व पंच:

फिडे आर्बिटर विशाल माधव आणि सहाय्यक ओमकार चव्हाण यांनी पंचगिरीचे काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युनियनचे सरचिटणीस नरेंद्र सावंत, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, मनोहर दरेकर, राजेश कांबळे, अमूल प्रभू, भार्गव धारगळकर, अशोक नवले, समीर तुळसकर, प्रवीण शिंदे, अमरेश ठाकूर आदी पदाधिकारी कार्यरत होते.


Post a Comment

0 Comments