प्रभादेवीत घुमणार स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा
आवाज
८ फेब्रुवारीपासून चढाई-पकडींचा थरार रंगणार
मुंबई, दि. २९ (क्री.प्र.): गेली आठ दशके कबड्डीचा दम घुमवणाऱ्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक
कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने अव्वल १२ व्यावसायिक संघांमध्ये चुरस पाहायला
मिळणार आहे. येत्या ८ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या विशेष व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धेत दिग्गज
कबड्डीपटूंच्या चढाया आणि पकडींचा थरार कबड्डीप्रेमींना अनुभवता येईल.
८१ वर्षांची परंपरा जपणारी स्पर्धा
प्रो कबड्डीच्या आगमनापूर्वीच कबड्डीला प्रतिष्ठा मिळवून
देणाऱ्या ८१ वर्षे जुन्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदाही व्यावसायिक गट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये
इन्शुअरकोट स्पोर्ट्स (युवा पलटन),
सेंट्रल बँक,
मुंबई महानगरपालिका,
रिझर्व्ह बँक,
मिडलाईन अकॅडमी,
एमपीएमसी पुणे,
मुंबई पोर्ट ट्रस्ट
यांसारखे बलाढ्य संघ सहभागी होत आहेत. प्रभादेवीच्या चवन्नी
गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील मॅटच्या मैदानावर हे संघ भिडणार आहेत.
विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
स्पर्धेत विजेत्या संघाला १,११,१११ रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार असून,
उपविजेत्याला ८०,००० रुपये आणि चषक प्रदान केला जाईल. उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांनाही विशेष रोख बक्षिसे देऊन
गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार व मंडळाचे प्रमुख कार्यवाह
महेश सावंत
यांनी दिली.
स्पर्धेचे स्वरूप आणि आयोजन
एकूण १२ संघ सहभागी
३-३ संघांचे ४ गट
प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
स्पर्धेतील सर्व सामने एकाच मॅटवर खेळवले जाणार
दररोज पाच सामने रंगणार
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे क्रीडाप्रमुख
रवी शिंदे
यांनी सांगितले की, स्पर्धा अधिक रोमांचक व स्पर्धात्मक होण्यासाठी विशेष
नियोजन करण्यात आले आहे. कबड्डीप्रेमींसाठी हा एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments