14वी इन्शुरन्स ओरिएंटल एलिट शील्ड टी-20
क्रिकेट स्पर्धा
ओरिएंटल इन्शुरन्सचा एअर इंडियावर रोमांचक विजय
मुंबई : ओरिएंटल इन्शुरन्सने 14व्या इन्शुरन्स ओरिएंटल एलिट शील्ड टी-20
क्रिकेट स्पर्धेत एअर
इंडियावर 4 विकेटने विजय मिळवत शानदार कामगिरी नोंदवली.
क्रॉस मैदान येथील नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या लढतीत एअर इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशाल गिरपने 47
धावांची संयमी खेळी
करत संघाचा डाव सावरला, तर लक्ष्य झंवरने 24
धावा
करून त्याला साथ दिली. मात्र, ओरिएंटल इन्शुरन्सच्या प्रभावी गोलंदाजीसमोर
इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत
आणि संघ 137
धावांवर गारद झाला.
ओरिएंटल इन्शुरन्सच्या आर्यवीर राकेशने 4/15 अशी भेदक मारा करत एअर इंडियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.
मीत पटेलनेही 2/27
च्या प्रभावी
गोलंदाजीतून महत्त्वाच्या विकेट घेतल्या, तर संतोष सुकेने किफायतशीर मारा करत धावगती रोखली.
चेसदरम्यान नाट्यमय घडामोडी
लक्ष्याचा पाठलाग करताना ओरिएंटल इन्शुरन्सच्या
सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. अमन वर्माने 66 धावांची झुंजार खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. सुमेध निकमने त्याला सुरुवातीला उत्तम साथ दिली,
आणि दोघांनी मिळून 77
धावांची भागीदारी
केली.
मात्र, या जोडीच्या बाद झाल्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्सच्या संघाने
काही वेळ संघर्ष केला. सलग तीन विकेट पडल्याने एअर इंडियाने सामन्यात पुनरागमन
करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्थव घोसाळकर आणि तरुण बसे यांनी संयम राखत सामना संघाच्या
बाजूने फिरवला आणि ओरिएंटल इन्शुरन्सने 6
विकेट राखून विजय
साकारला.
संक्षिप्त धावफलक:
➡ एअर इंडिया - 137 सर्वबाद (विशाल गिरप 47, लक्ष्य झंवर 24; आर्यवीर राकेश 4/15, मीत पटेल 2/27)
➡ ओरिएंटल इन्शुरन्स - 6 बाद 138
(अमन वर्मा 66;
सार्थक भिडे 3/30)
उद्घाटन सोहळा आणि प्रमुख पाहुणे
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या उपमहाव्यवस्थापक व्ही.
रीमादेवी, एमसीएचे पदाधिकारी संदिप विचारे आणि मंगेश साटम
उपस्थित होते. प्रतिष्ठित मान्यवर,
आयोजक आणि क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने या प्रतिष्ठित
स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
फोटो: अमन वर्मा – उजव्या हाताचा फलंदाज, आर्यवीर राकेश – उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज

Post a Comment
0 Comments