Type Here to Get Search Results !

सालार जंग टी-20 क्रिकेट स्पर्धा ओंकारच्या शतकाने केएससीच्या विजयावर शिक्कामोर्तब


 

सालार जंग टी-20 क्रिकेट स्पर्धा

ओंकारच्या शतकाने केएससीच्या विजयावर शिक्कामोर्तब

 

मुंबई : कर्णधार ओंकार जाधवच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर कुर्ला स्पोर्ट्स क्लबने (केएससी) 75व्या सालार जंग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या फेरीत यंग फ्रेंड्स सीसीचा 8 विकेटने पराभव करत शानदार विजय मिळवला.

 

इस्लाम जिमखाना मैदानावर कोडिया ग्रुपच्या वतीने आयोजित या स्पर्धेत यंग फ्रेंड्स सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 162 धावा केल्या. निनाद कदमने 35 आणि नितेश रायने 34 धावा करत संघाचा डाव सावरला. केएससीकडून आयुष रघुवंशीने 3, तर आशय दुबे आणि ओंकार जाधवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

 

162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओंकार जाधवने केवळ 52 चेंडूंत नाबाद 100 धावा करत सामना एकतर्फी केला. त्याच्या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकार होते. त्याला जयेश चंदनकरने 43 धावांची चांगली साथ दिली. केएससीने हे लक्ष्य 16.1 षटकांत 2 विकेटच्या बदल्यात सहज पार केले.

 

पोलीस जिमखान्याचा रोमांचक विजय

या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात पोलीस जिमखान्याने अवघ्या 2 धावांनी मॉडर्न क्रिकेटवर रोमांचक विजय मिळवला.

 

पोलीस जिमखान्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 190 धावा केल्या. हर्ष आघावने 68, तर निसार शेखने 32 धावा करून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. प्रतिसादात मॉडर्न क्रिकेटने जोरदार झुंज दिली पण त्यांच्या फलंदाजांना अंतिम टप्प्यात अपयश आल्याने संघ 20 षटकांत 8 बाद 188 धावांवरच थांबला.

 

संक्षिप्त धावफलक :

कुर्ला स्पोर्ट्स क्लब - 16.1 षटकांत 2 बाद 165 (ओंकार जाधव 100, जयेश चंदनकर 43; संदीप यादव 2/33) वि. यंग फ्रेंड्स सीसी - 20 षटकांत 9 बाद 162 (निनाद कदम 35, नितेश राय 34; आयुष रघुवंशी 3/27, ओंकार जाधव 2/19, आशय दुबे 2/22).

पोलीस जिमखाना - 20 षटकांत 7 बाद 190 (हर्ष आघाव 68, निसार शेख 32; आकिब शेख 3/41, सैफ शेख 2/25) वि. मॉडर्न क्रिकेट - 20 षटकांत 8 बाद 188 (अहमर कर्टे 48, सुर्जन आठवले 42; सचिन शिंदे 2/36*).

 

Post a Comment

0 Comments