Type Here to Get Search Results !

सीसीआय स्नूकर क्लासिक 2025 स्पर्धा लौकिक पाठारे, कैझाद फिटर दुसऱ्या फेरीत


 

सीसीआय स्नूकर क्लासिक 2025 स्पर्धा

लौकिक पाठारे, कैझाद फिटर दुसऱ्या फेरीत

 

मुंबई, २५ फेब्रुवारी: अनुभवी क्यूईस्ट लौकिक पाठारे आणि कैझाद फिटर यांनी सीसीआय स्नूकर क्लासिक 2025 स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सरळ तीन फ्रेम्सने विजय मिळवला.

 

क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या या प्रतिष्ठित अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेत मंगळवारी लौकिक पाठारेने इशान नगरचा 3-0 (65-37, 63-52, 73-20) असा पराभव केला. त्याचप्रमाणे, कैझाद फिटरने प्रमोद शाहवर 3-0 (52-43, 27-65, 59-47) असा सहज विजय मिळवला.

 

स्पर्धेत मेहराज मेमन, मितेश ठक्कर, सुमीत नायडू, ऋषी रामय्या, ओम सावंत आणि ऋषभ पंचमिया यांच्यासह अनेक खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.

 

निकाल – पात्रता फेरी 1:

मेहराज मेमन विजयी वि. सूर्या तेजा – 3-2 (34-61, 72-37, 44-61, 70-32, 62-32), कैझाद फिटर विजयी वि. प्रमोद शाह – 3-0 (52-43, 27-65, 59-47), मितेश ठक्कर विजयी वि. नौजद मुन्शी३-१ (51-49, 44-52, 55-36, 62-64), सुमीत नायडू विजयी वि. शफीक खत्री – 3-0 (62-5, 62-18, 66-35), ऋषी रामय्या विजयी वि. राहुल नारंग – 3-2 (55-17, 36-69, 38-58, 59-47, 59-32), लौकिक पाठारे विजयी वि. इशान नगर – 3-0 (65-37, 63-52, 73-20), ओम सावंत विजयी वि. जिगिश चोक्सी – 3-0 (69-36, 51-30, 64-12), ऋषभ पंचमिया विजयी वि. पार्थ दवे – 3-0 (77-33, 63-29, 63-23), निखिल घाडगे विजयी वि. रोहन जैन – 3-1 (21-54, 71-38, 63-23, 58-30)

 

Post a Comment

0 Comments