Type Here to Get Search Results !

इन्शुरन्स शील्ड टी-20 क्रिकेट स्पर्धा बीएआरसीच्या विजयात सलामीवीर रवी कोळी चमकला


इन्शुरन्स शील्ड टी-20 क्रिकेट स्पर्धा

बीएआरसीच्या विजयात सलामीवीर रवी कोळी चमकला

 

मुंबई, २५ फेब्रुवारी: इन्शुरन्स शील्ड टी-20 क्रिकेट स्पर्धेत बीएआरसी एससीने दमदार कामगिरी करत एमटीएनएल एससीवर 71 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात सलामीवीर रवी कोळीने 83 धावांची दिमाखदार खेळी करत बीएआरसीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

क्रॉस मैदानावर झालेल्या या सामन्यात बीएआरसीच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. रवी कोळीच्या 83 धावांच्या खेळीला कल्पेश केणीच्या 49 आणि जयचंद्रन एस.च्या 32 धावांनी चांगली साथ दिली, त्यामुळे संघाने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 191 धावांचा भक्कम स्कोर उभारला.

 

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना एमटीएनएल एससीचा डाव डगमगला. गजानन शिंदे (46) आणि विशाल देसाई (39) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. बीएआरसीच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत एमटीएनएलला 20 षटकांत 6 बाद 120 धावांवर रोखले. समाधान के.ने 2/19 अशी प्रभावी गोलंदाजी केली.

 

संक्षिप्त धावफलक:

बीएआरसी एससी – 20 षटकांत 5 बाद 191 (रवी कोळी 83, कल्पेश केणी 49, जयचंद्रन एस. 32),


एमटीएनएल एससी – 20 षटकांत 6 बाद 120 (गजानन शिंदे 46, विशाल देसाई 39; समाधान के. 2/19)


निकाल: बीएआरसी एससी 71 धावांनी विजयी.

 

इतर निकाल:

कॅनरा बँक – 20 षटकांत 6 बाद 105 (किरण जाधव 44*; सिद्धेश चव्हाण 2/12)

लार्सन अँड टुब्रो एससी – 11.2 षटकांत 4 बाद 106 (निषाद मुतालिक 50)
निकाल: लार्सन अँड टुब्रो 6 विकेट राखून विजयी.

 

फोटो: रवी कोळीने 83 धावा फटकावत बीएआरसी एससीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


 


Post a Comment

0 Comments