शिवाजी पार्क कॅरम स्पर्धेत घुफ्रान आणि सागर उपांत्य फेरीत
मुंबई: सारस्वत बँक पुरस्कृत १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत
पुरुष गटाच्या उपउपांत्य फेरीत शानदार कामगिरी करत
मुंबईच्या महम्मद घुफ्रान आणि पुण्याच्या सागर वाघमारेने उपांत्य फेरीत धडक मारली.
मुंबईच्या घुफ्रानने पुण्याच्या प्रकाश गायकवाडला २५-०,
२५-१७
असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून सहज विजय मिळवला. दुसऱ्या
उपउपांत्य सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या संजय मांडेवर २५-१३,
२३-९
असा सहज विजय मिळवला.
महिला गटातही रोमांचक सामने पाहायला मिळाले.
रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने
चुरशीच्या लढतीत मुंबईच्या समिधा जाधवला ८-१५,
२२-९,
२५-६
असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरी निकाल:
महम्मद घुफ्रान (मुंबई) वि. प्रकाश गायकवाड (पुणे)
– २५-०,
२५-१७
सागर वाघमारे (पुणे) वि. संजय
मांडे (मुंबई) – २५-१३, २३-९
संदीप देवरुखकर (मुंबई) वि. प्रफुल
मोरे (मुंबई) – १९-८, २५-१२
हरेश्वर बेतवंशी (मुंबई) वि. राहुल
सोळंकी (गैरहजर)
महिला एकेरी उपउपांत्य फेरी निकाल:
आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि. समिधा जाधव (मुंबई)
– ८-१५,
२२-९,
२५-६
श्रुती सोनावणे (पालघर) वि.
पुष्कर्णी भट्टड (पुणे) – १०-२५, २५-१, २४-१
काजल कुमारी (मुंबई) वि. मिताली
पाठक (मुंबई) – १५-१४, २५-८
समृद्धी घाडीगावकर (ठाणे) वि.
रिंकी कुमारी (मुंबई) – गैरहजर
स्पर्धेतील पुढील टप्प्यात घुफ्रान आणि सागर यांच्यात
उपांत्य फेरीत थरारक लढत होण्याची शक्यता आहे. तसेच महिला गटात आकांक्षा कदम,
काजल कुमारी आणि श्रुती सोनावणे यांची चांगली कामगिरी
पाहायला मिळणार आहे.
छायाचित्र: प्रकाश गायकवाड विरुद्ध महम्मद घुफ्रान यांच्यातील
सामन्याचे.

Post a Comment
0 Comments