एसजी पायपर्स चित्ताने मोटेरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडेल लीग चॅम्पियनशिप
जिंकली
मुंबई, एसजी
पायपर्स चित्ता संघाने शानदार कामगिरी करत मोटेरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडेल लीग चॅम्पियनशिपवर
आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी वेर्नोस्ट जग्वार्स संघावर २४-१५ असा
दमदार विजय मिळवला. नेस्को सेंटर, मुंबई येथे झालेल्या या रोमांचक सामन्याने चार दिवसांच्या जबरदस्त
पॅडल ऍक्शनचा थरार गाठला.
अंतिम सामन्यातील रोमहर्षक लढत
संघाची सुरुवात मिक्स्ड डबल्स सामन्याने झाली. एसजी पायपर्स चित्ता संघाच्या पोल हर्नांडेझ आणि जुलिएटा बिडाहोरिया
यांनी ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, वेर्नोस्ट जग्वार्स संघाच्या अलेजांद्रो अरोयो आणि मारिया रीएरा
यांनी जोरदार पुनरागमन करत तीन सलग गेम जिंकून सामना
३-३ ने बरोबरीत सोडवला. त्यानंतर चित्तास संघाने पुढील दोन गेम जिंकत ५-३ अशी आघाडी घेतली, परंतु जग्वार्स संघाने पुन्हा दमदार पुनरागमन करत ७-५ असा सेट जिंकला.
महिला दुहेरीत, वेर्नोस्ट जग्वार्स संघाच्या अलेजांद्रा सालाझार आणि तामारा इकार्डो
यांनी एसजी पायपर्स चित्ता संघाच्या क्लॉडिया फर्नांडेझ आणि बिअट्रिज गोंझालेझ
यांच्या पहिल्याच सर्व्हिस ब्रेक केली. मात्र,
चित्तास संघाने त्वरित प्रत्युत्तर देत बरोबरी साधली. त्यानंतर चित्तासच्या
जोडीने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवत सलग सहा गेम जिंकले आणि ६-१
अशा सहज विजयासह संघासाठी महत्त्वाची आघाडी मिळवली. या
विजयामुळे एसजी पायपर्स चित्ता
संघ एकूण स्कोअरमध्ये ११-८ ने आघाडीवर गेला.
पुरुष दुहेरीत, एसजी पायपर्स चित्ता संघाच्या एन्रिक गोएनागा आणि टिओदोर झपाटा यांनी तणावपूर्ण टायब्रेकमध्ये वेर्नोस्ट जग्वार्स संघाच्या
डेव्हिड सांचेज आणि अॅरिस
पॅटिनिओटिस यांना ७-६ अशा निसटत्या फरकाने
पराभूत केले. या विजयामुळे एसजी
पायपर्स चित्ता संघाने १८-१४ अशी आघाडी मिळवली आणि
अंतिम सेटसाठी महत्त्वाचा आत्मविश्वास मिळवला.
शेवटच्या आणि निर्णायक पुरुष दुहेरी सामन्यात,
एसजी पायपर्स चित्ता
संघाच्या फ्रान्सिस्को गुरेरो आणि जुआनलू एस्ब्री
यांनी जबरदस्त खेळ करत वेर्नोस्ट जग्वार्स संघाच्या
लुकास कॅम्पॅग्नोलो आणि
मॅक्सिमिलियानो सांचेज यांना ६-१ अशा एकतर्फी फरकाने पराभूत केले. या शानदार विजयासह एसजी पायपर्स चित्ता संघाने २४-१५ अशा मोठ्या फरकाने अंतिम विजय मिळवत मोटेरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडेल लीग चॅम्पियनशिप
जिंकली.
भारतातील पॅडेल क्रीडा इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात
भारतीय पॅडेल
महासंघ (IPF) च्या सहकार्याने, आयडी इन्फो बिझनेस सेर्विसेस ली. यांच्यातर्फे आयोजित आणि मैसूर यांच्या पाठिंब्याने चालवलेल्या
मोटेरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडेल
लीग स्पर्धेने भारतात भव्य पदार्पण केले. भारतीय क्रीडा
रसिकांना या रोमांचक खेळाची अनुभूती देत, ही स्पर्धा भारतात पॅडेल क्रीडेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
या भव्य यशानंतर, पॅडेल लीग ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा एकदा परतणार असून,
आणखी मोठ्या आणि रोमांचक लीगसाठी तयारी सुरू आहे.
विजयानंतर खेळाडूंच्या प्रतिक्रिया
एसजी पायपर्स चित्ता संघाचा खेळाडू एन्रिक गोएनागा म्हणाला, "ही आमच्यासाठी एक अविस्मरणीय आठवड्याची स्पर्धा होती.
माझ्या संघातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन! आम्ही उच्चस्तरीय खेळ केला आणि हा विजय
आमच्यासाठी खूप खास आहे."
त्याचे संघसहकारी जुआनलू एस्ब्री म्हणाले, "भारतीय प्रेक्षकांसमोर खेळणे ही एक अद्भुत गोष्ट होती.
त्यांचा उत्साह आणि पाठिंबा आम्हाला जाणवला. भारतात पॅडेल खेळाचा नक्कीच प्रसार होईल, आणि आम्हाला येथे पुन्हा परतण्याची उत्सुकता आहे."
मोटेरा डेव्हलपर्स वर्ल्ड पॅडेल लीग स्पर्धेने
निश्चितच भारतीय क्रीडाप्रेमींवर अमिट छाप सोडली असून,
२०२५ मध्ये अधिक भव्य पुनरागमनासाठी तयारी सुरू झाली आहे.



.jpeg)
Post a Comment
0 Comments