Type Here to Get Search Results !

खेलो तायक्वांदो अकादमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार पराक्रम!


खेलो तायक्वांदो अकादमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार पराक्रम!

 

मुंबई: पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या ५ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या खेलो तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत ८ सुवर्ण, ७ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची लयलूट केली.

 

अभिमानास्पद सुवर्ण कामगिरी!

अकादमीच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्राच्या तायक्वांदो क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली. विवांश घोष, रिद्धी शुक्ला, दक्ष शेजवळ, आस्था कांबळे आणि अराध्या मॉडंल यांनी सुवर्णपदक पटकावून आपल्या कौशल्याची चमक दाखवली.

 

प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा

या घवघवीत यशामागे अकादमीच्या राजेश मुराव, स्वप्निल साळुंखे आणि तुषार पाटील या प्रशिक्षकांचे अथक मार्गदर्शन असून, त्यांनी खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षण दिले.

 

मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे मोलाचे सहकार्य

खेलो तायक्वांदो अकादमीला मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांचे नेहमीच प्रोत्साहन आणि सहकार्य लाभत आहे. त्यांच्या पाठबळामुळेच खेळाडूंना उत्तम सुविधा व संधी मिळत असून, महाराष्ट्राला भविष्यातील तायक्वांदो सुपरस्टार्स घडवण्याचे काम ही अकादमी करत आहे.

 

खेलो तायक्वांदो अकादमीने राज्यस्तरीय पातळीवर आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवण्याचा निर्धार केला आहे!


Post a Comment

0 Comments