राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राची उपांत्यपूर्व
फेरीत हार
पंजाबने ३५-२६ ने नामोहरम केले
कटक : कटक, ओडिसा येथे सुरू असलेल्या ७१व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत
महाराष्ट्राच्या आशा उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आल्या.
पंजाबने महाराष्ट्राचा ३५-२६ असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
महाराष्ट्राने सामना जोरदार सुरुवात करत
२-० अशी आघाडी घेतली
होती. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी अटीतटीची झुंज दिली.
विश्रांतीला पंजाबकडे केवळ एका
गुणाची आघाडी (१३-१२) होती. मात्र, उत्तरार्धात महाराष्ट्राचा खेळ अपेक्षेप्रमाणे उंचावला
नाही. पंजाबने आक्रमक खेळ करत महाराष्ट्राच्या चढायांवर प्रभावी बचाव केला आणि
सामना आपल्या बाजूने झुकवला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सेनादलाने हरियाणाचा ४३-२६ असा दणदणीत पराभव करत उपांत्य
फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या संघाने साखळी फेरीत दमदार प्रदर्शन केले
असले तरी निर्णायक टप्प्यावर संघाला गती राखता आली नाही. प्रशिक्षक आणि खेळाडूंनी
चांगला प्रयत्न केला असला तरी पंजाबच्या संघाने बचाव आणि चढाईत सरस खेळ करत
विजयावर शिक्कामोर्तब केले.

Post a Comment
0 Comments